Join us

Milk Subsidy Update : ऑक्टोबर पासून दूध अनुदानात होणार वाढ; जीआर आला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 11:21 AM

राज्यातील सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांमार्फत संकलित होणाऱ्या गाय दुधाकरिता शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रतिलिटर पाच रुपये अनुदानात १ ऑक्टोबरपासून दोन रुपयांची वाढ करण्यात येणार आहे.

राज्यातील सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांमार्फत संकलित होणाऱ्या गाय दुधाकरिता शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रतिलिटर पाच रुपये अनुदानात १ ऑक्टोबरपासून दोन रुपयांची वाढ करण्यात येणार आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दूध भुकटी व बटरचे दर हे कोसळलेले असले तरी राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त भाव मिळावा, या हेतूने अनुदानात वाढ करण्याचा निर्णय सोमवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता.

त्यानुसार गुरुवारी सरकारने याबाबतचा जीआर काढला आहे. १२ जुलैला घोषित केल्यानुसार दूध भुकटी निर्यातीस ३० रुपये प्रतिकिलो प्रोत्साहनपर अनुदान व दूध भुकटी रूपांतरणास प्रतिलिटर १ रुपये ५० पैसे अनुदान ३० सप्टेंबरपर्यंतच देय राहील.  त्यानंतर सदर योजना सप्टेंबरपासून बंद करण्यात येणार आहे.

पुढे १ ऑक्टोबरपासून दोन रुपयांची वाढ असलेले अनुदान सुरू होईल.

हेही वाचा : शेतकरी, शेतमजूर यांना अनुदानावर मिळणार गाय, शेळी अन् मुरघास बॅग

टॅग्स :दूधशेतकरीशेतीदुग्धव्यवसायशेती क्षेत्र