Join us

शेतकऱ्यांनो हे कराल, तरच मिळेल दुध अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2024 5:23 PM

शासनाकडून घोषित करण्यात आलेल्या प्रति लिटर रु. ५/अनुदान प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या पशुधनाची माहिती संबंधित दुध संघ तसेच दुध संस्था यांना जमा करावयाची आहे. 

शासनाकडून घोषित करण्यात आलेल्या प्रति लिटर रु. ५/अनुदान प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या पशुधनाची माहिती संबंधित दुध संघ तसेच दुध संस्था यांना जमा करावयाची आहे. शासनाने प्रति लिटर ५ रु अनुदान थेट दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग करण्याचा निर्णय घेतला असून सदर अनुदानाचा लाभ घेण्यासाठी दुध उत्पादक सभासद संस्थेस पुरवठा करीत असलेल्या दुध उत्पादक शेतकऱ्यांकडुन खालील सर्व कागदपत्रांची पूर्तता दुध संकलन केंद्र चालक/BMC/MCC चालक यांनी करुन घेऊन संघास सादर करावी.१) दुध उत्पादक शेतकऱ्यांचे नाव, बँकेचे नाव, (आधारकार्डशी लिंक असलेले) शाखा, खाते क्रमांक, IFSC कोड तपशीलवर माहिती सोबत बँक खाते धनादेशाची छायांकित प्रत व आधारकार्ड छायांकित प्रत.२) दुध उत्पादक शेतकऱ्यांचे पशुधनांची संख्या.३) आधार कार्ड शी लिंक असलेल्या पशुधन संख्या पैकी Ear Tagging केलेल्या पशुधन संख्या व Ear Tagging क्रमांक.४) पशुधन संख्या पैकी Ear Tagging न केलेल्या पशुधन संख्येची नोंद नजिकच्या पशुवैद्यकिय दवाखान्यात नोंद करुन Ear Tagging करुन घेण्याची दुध उत्पादक यांना सुचना करावी.५) योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्याकडील दुधाळ जनावरांची नोंदणी (Ear Tag) महाराष्ट्र राज्यात INAPH/भारत पशुधन पोर्टलवर असणे बंधनकारक राहील.६) शेतकऱ्यांचे आधार लिंक बैंक खात्याची पशुधनाची INAPH/भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी करण्यात यावी.

नमुनासंस्थेचे नाव: 

अ.क्रदुध उत्पादक शेतकऱ्याचे नावआधारकार्ड नंबरसंस्थेत दूध पुरवठा लिबँकेचे नावशाखाखाते क्रमांकIFSC कोडपशुधन संख्याEar Tagging क्रमांक
          

संस्थेने सभासद असलेल्या किवा संस्थेस दुध पुरवठा करीत असलेल्या सर्व दुध उत्पादक शेतकऱ्यांना नजिकच्या पशुवैद्यकिय दवाखान्यातील पशुवैद्यकिय अधिकारी यांस संपर्क करणे बाबत सुचना देऊन आपले आधारकार्ड सोबत त्यांच्याकडील उपलब्ध पशुधन संख्या Ear Tagging क्रमांकची नोंद घेऊन वरील तक्त्यात माहिती संघास सादर करावी. उपरोक्त माहिती प्राप्त न झाल्यास शासनाचे अनुदान प्राप्त होणार नाही याची कल्पना दुध उत्पादक शेतकऱ्यांना अवगत करुन द्यावी. शासन स्थरावरुन येणाऱ्या सुचना आवश्यकते नुसार आपणांस वेळोवेळी कळवण्यात येतील.

टॅग्स :दुग्धव्यवसायशेतकरीदूधबँकसरकारराज्य सरकारसरकारी योजना