Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Murghas : मुरघास तयार करताना पिकांची निवड कशी करावी? वाचा सविस्तर

Murghas : मुरघास तयार करताना पिकांची निवड कशी करावी? वाचा सविस्तर

Murghas : How to choose crops while making Murghas? Read in detail | Murghas : मुरघास तयार करताना पिकांची निवड कशी करावी? वाचा सविस्तर

Murghas : मुरघास तयार करताना पिकांची निवड कशी करावी? वाचा सविस्तर

मुरघास म्हणजे हवा विरहीत जागेत किंनविकरण करून साठवलेला हिरवा चारा किंवा अगदी सोप्या भाषेत सांगावयाचे झाले तर हिरव्या चाऱ्याचा फारसा कस कमी न होऊ देता हवाबंद स्थितीत साठवून ठेवण्याच्या पद्धतीस मुरघास असे म्हटले जाते.

मुरघास म्हणजे हवा विरहीत जागेत किंनविकरण करून साठवलेला हिरवा चारा किंवा अगदी सोप्या भाषेत सांगावयाचे झाले तर हिरव्या चाऱ्याचा फारसा कस कमी न होऊ देता हवाबंद स्थितीत साठवून ठेवण्याच्या पद्धतीस मुरघास असे म्हटले जाते.

शेअर :

Join us
Join usNext

मुरघास खरे तर हि एक आंबवण्याची प्रक्रीया आहे. मुरघास म्हणजे हवा विरहीत जागेत किंनविकरण करून साठवलेला हिरवा चारा किंवा अगदी सोप्या भाषेत सांगावयाचे झाले तर हिरव्या चाऱ्याचा फारसा कस कमी न होऊ देता हवाबंद स्थितीत साठवून ठेवण्याच्या पद्धतीस मुरघास असे म्हटले जाते.

मुरघासच का?
चारा साठवण्याच्या इतर काही पद्धतीमध्ये मुरघास हि एक महत्वाची पद्धत आहे, त्याच कारण अस कि पारंपारिक पद्धतीमध्ये चारा वाळऊन साठवला जातो. परंतु याद्वारे साठवलेल्या चाऱ्यातील पोषक द्रव्यांचा ऱ्हास मोठ्या प्रमाणावर झालेला दिसून येतो. मात्र मुरघास पद्धतीने साठवलेल्या चाऱ्यातील ऱ्हास अगदी कमी प्रमाणात होतो तसेच हा चारा जनावरे अगदी चवीने खातात.

मुरघास करण्यासाठी पिकांची निवड कशी करावी?
-
चांगल्या प्रकारचा मुरघास तयार करण्यासाठी एकदल चारा पिके द्विदल चारा पिकापेक्षा अतिशय योग्य आहेत.
- कारण ज्या पिकांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते त्या पिकांपासून अतिशय उत्कृष्ट मुरघास तयार होतो.यामुळे तृणधान्य पिके योग्य समजली जातात.
- त्यामध्ये मका आणि ज्वारी या पिकापासून उत्कृष्ट मुरघास तयार होतो.
- याशिवाय बाजरी, संकरीत नेपियर,ओट या एकदलवर्गीय पिकापासून चांगला मुरघास तयार करता येतो.
- द्विदल चारा पिकापासुनही मुरघास तयार करता येतो पण त्यासाठी या पिकासोबत ५० टक्के एकदलवर्गीय पिक साठवावे लागते.
- सेच गुळाचा योग्य वापर आवश्यक असतो.योग्य मुरघास तयार करण्यासाठी चारा पिके ५० टक्के फुलोरा अवस्थेत असताना कापणी करावी लागते.

मुरघासाचे फायदे
-
हिरव्या चाऱ्याचा तुटवडा उन्हाळ्यात भासतो त्यावेळी उत्तम पर्याय.
- हिरव्या चाऱ्यासारखा गुणवत्ता असणारा चारा म्हणजे मुरघास.
- दुभत्या जनावरांना उत्पादन सातत्य राखण्यासाठी तो उपयोगी ठरतो.
- याद्वारे हिरवा चारा चांगल्या अवस्थेत दीर्घकाळ टिकवून ठेवता येतो.
- गवतासारख्या निकृष्ठ वनस्पतीपासुनही चांगल्या प्रकारे मुरघास करता येतो.
- जास्त प्रक्षेत्रावरील पिक कमी जागेत साठून ठेवता येते. 
- चारा पिक लवकर कापणी होत असल्यामुळे शेत दुसऱ्या पिकाकरीता मोकळे होते.

Web Title: Murghas : How to choose crops while making Murghas? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.