Murghas मुरघास खरे तर ही एक आंबवण्याची प्रक्रीया आहे. मुरघास म्हणजे हवा विरहीत जागेत किण्वन करून साठवलेला हिरवा चारा होय.
अगदी सोप्या भाषेत सांगावयाचे झाले तर हिरव्या चाऱ्याचा फारसा कस कमी न होऊ देता हवाबंद स्थितीत साठवून ठेवण्याच्या पद्धतीस मुरघास असे म्हटले जाते.
मुरघास चांगला तयार झाल्याचे गुणधर्म
१) मुरघासाची प्रत कशी आहे हे आपण त्याचा वास, रंग आणि सामू यावरून ठरवता येते.
२) जर मुरघासास आंबट गोड दह्यासारखा वास येत असेल आणि रंग पिवळसर, फिक्कट हिरवा असल्यास उत्तम प्रकारचा मुरघास तयार झाला आहे असे समजावे.
३) याशिवाय जर मुरघासाचा सामू ३.८ ते ४.२ दरम्यान असेल तर उत्तम प्रकारचा मुरघास तयार झाला आहे असे समजावे.
४) पण मुरघासाचा वास कुजल्यासारखा आणि रंग काळसर झाला असेल तर मुरघास खराब झाला आहे असे समजून तो जनावरांना खाऊ घालू नये.
५) उत्तम मुरघास तयार झाल्यानंतर ६ महिने ते एक वर्षापर्यंत जनावरांना खाऊ घालता येतो.
जनावरांना मुरघास देण्याचे प्रमाण
- पूर्ण वाढ झालेल्या दुभत्या जनावरास रोज १५ किलोपर्यंत मुरघास खाऊ घालावा.
- बैलांना ७ ते ८ किलो प्रती दिन तसेच एक वर्षापेक्षा कमी वयाच्या वासरांना अर्धा किलो खाऊ घालावा.
- शेळ्या-मेंढ्यांना दर रोज एक किलो मुरघास खाऊ घालावा.
अधिक वाचा: भविष्यातील सुदृढ गाय निर्माण करण्यासाठी कसे कराल वासारांतील रोग नियंत्रण