Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Bullock Cart Race बैलगाडी शर्यतीसाठी नवी नियमावली, हे कराल तरच मिळेल परवानगी

Bullock Cart Race बैलगाडी शर्यतीसाठी नवी नियमावली, हे कराल तरच मिळेल परवानगी

New rules for bullock cart race, Only if you do this will you get permission | Bullock Cart Race बैलगाडी शर्यतीसाठी नवी नियमावली, हे कराल तरच मिळेल परवानगी

Bullock Cart Race बैलगाडी शर्यतीसाठी नवी नियमावली, हे कराल तरच मिळेल परवानगी

ईअर टॅगिंग न केलेले बैल शर्यतीत धावले तर संबंबित आयोजक, मालक यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले. Animal Ear Tagging टॅगिंग नसलेल्या कोणत्याही पशुंसाठी शासकीय दाखले दिले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ईअर टॅगिंग न केलेले बैल शर्यतीत धावले तर संबंबित आयोजक, मालक यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले. Animal Ear Tagging टॅगिंग नसलेल्या कोणत्याही पशुंसाठी शासकीय दाखले दिले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शेअर :

Join us
Join usNext

सांगली : ईअर टॅगिंग न केलेले बैल शर्यतीत धावले तर संबंबित आयोजक, मालक यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले. टॅगिंग नसलेल्या कोणत्याही पशुंसाठी शासकीय दाखले दिले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दयानिधी यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, पशुधनाची सर्वकष माहिती एका ठिकाणी उपलब्ध होऊन पशुधनामधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रण करण्याकरिता तसेच पशू व पशुजन्य उत्पादन वाढीसाठी राज्यातील सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करण्यात येत आहे.

प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ व शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पशुधनास ईअर टॅगिंग बंधनकारक केले आहे. त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करावी.

सांगली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महापालिका प्रशासनाने येत्या १ जूननंतर ईजर टॅगिंग शिवाय पशुधनास पशुवैद्यकीय संस्था, दवाखान्यामधून कोणतीही पशुवैद्यकीय सेवा देऊ नये.

त्यांच्या अधिनस्त असलेल्या कत्तलखान्यामध्ये टॅग असल्याशिवाय म्हैसवर्गीय जनावरांची कत्तल करण्यास परवानगी देण्यात येऊ नये. टॅगिंग नसलेल्या कोणत्याही पशूसाठी शासकीय दाखले दिले जाणार नाहीअसे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

वाहतुकीला बंदी, दंडात्मक कारवाई
• कोणत्याही पशुधनाची वाहतूक ईअर टॅगिंग असल्याशिवाय करता येणार नाही. अशी वाहतूक करणाऱ्या पशुधनाचे मालक व वाहतूकदार यांच्यावर कायदेशीर व दद्वात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
• बाजार समित्या, आठवडी बाजार व गावागावातील खरेदी-विक्री बाजारात ईअरटॅग नसलेल्या पशुधनास प्रवेश देण्यात येऊ नयेच त्यांची खरेदी-विक्रीदेखील होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी म्हटले आहे.

प्रशासनावर जबाबदारी
सांगली जिल्ह्यातील पोलिस विभाग, वनविभाग, महसूल विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी ईअर टॅगिंगची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश डॉ. राजा दयानिधी यांनी दिले आहेत.

नुकसानभरपाई मिळणार नाही
नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्य पशूच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास ईअर टॅगिंग नसल्यास अशा पशुपालकांना नुकसानभरपाईची रक्कम दिली जाणार नाही. याचाबत सर्व महसूल, वन, वीज व महावितरण विभाग यांना जिल्हाधिकारी यांच्याकडून महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ईअर टॅगचा क्रमांक नमूद
होणार ग्रामपंचायतीमध्ये पशूच्या विक्री किवा परिवर्तनाचा दाखला देताना पशुधनाची ईअर टॅगिंगची खात्री केली जाईल. दाखल्यावर ईअर टॅगचा क्रमांक नमूद करण्यात येणार आहे.

महत्वाच्या सूचना
• सांगली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, महसूल व गृह विभाग प्रशासनाने ईअर टॅग नसलेल्या वैलाना बैलगाडी शर्यतीमध्ये सहभाग घेण्यास परवानगी देण्यात येऊ नये.
• पशुधनाच्या मालकी हस्तांतरणाबाबतच्या नोंदी संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अद्ययावत करून घेण्याची जबाबदारी संबंधित पशुपालकाची राहील.

अधिक वाचा: Gokul Milk म्हैस दूध उत्पादन वाढीसाठी 'गोकुळ'ला अमेरिकेतून १ कोटी ४६ लाख फंड; कसा आहे प्रकल्प

Web Title: New rules for bullock cart race, Only if you do this will you get permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.