Join us

Pandharpur Janavare Bajar : माघी यात्रेनिमित्त पंढरपुरातील वाखरीत भरणार जनावरांचा बाजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 11:44 IST

वाखरी (ता. पंढरपूर) येथील पालखी तळावर माघ यात्रेनिमित्त जनावरांचा बाजार भरणार आहे. या बाजारामध्ये जनावरे प्रदर्शन या बाजार समितीच्या वतीने भरविण्यात येणार आहे.

पंढरपूर : वाखरी (ता. पंढरपूर) येथील पालखी तळावर माघ यात्रेनिमित्त जनावरांचा बाजार भरणार आहे. या बाजारामध्ये जनावरे प्रदर्शन या बाजार समितीच्या वतीने भरविण्यात येणार, अशी माहिती बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड यांनी दिली आहे.

सर्व शेतकरी बंधू पशुपालक, जनावरांचे व्यापारी व सर्व संबंधित घटकांनी माघ यात्रा जनावराच्या बाजारात आपली निरोगी जनावरे खरेदी विक्रीसाठी आणावीत.

तसेच जातिवंत खिलार जनावरांसाठी जनावरे प्रदर्शन भरविले जाणार आहे. या प्रदर्शनामध्ये भाग घेण्यासाठी ७ ते ८ फेब्रुवारीअखेर नाव नोंदणी करावी. त्याशिवाय प्रदर्शनामध्ये भाग घेता येणार नाही.

तसेच रविवार ०९ फेब्रुवारीला सकाळी आठ वाजता निवड होणार असून, माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते निवड झालेल्यांचा बक्षीस वितरण समारंभ होणार असल्याचे बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड व उपसभापती राजू गावडे यांनी दिली. 

अधिक वाचा: पशुधनातील खच्चीकरणाचे महत्त्व काय? खच्चीकरण का आणि कशासाठी करायचे? वाचा सविस्तर

टॅग्स :पंढरपूरदुग्धव्यवसायबाजारमार्केट यार्डपंढरपूर वारी