Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Pashu Ganana 2024 : पशुपालकांनी आपल्या उन्नतीसाठी पशुगणनेत पशुधनाची नोंद न चुकता करा

Pashu Ganana 2024 : पशुपालकांनी आपल्या उन्नतीसाठी पशुगणनेत पशुधनाची नोंद न चुकता करा

Pashu Ganana 2024 : Livestock farmers should register their livestock in livestock census for their prosperity | Pashu Ganana 2024 : पशुपालकांनी आपल्या उन्नतीसाठी पशुगणनेत पशुधनाची नोंद न चुकता करा

Pashu Ganana 2024 : पशुपालकांनी आपल्या उन्नतीसाठी पशुगणनेत पशुधनाची नोंद न चुकता करा

नियमित दर पाच वर्षांनी पशुगणना होत असते. मागील पशुगणना २०१७ मध्ये झाली होती. २०२२ मध्ये होणारी पशुगनणा कोविडमुळे आता होत आहे. २१ वी पशुगणना सप्टेंबर ते डिसेंबर २०२४ या कालावधीत होणार आहे.

नियमित दर पाच वर्षांनी पशुगणना होत असते. मागील पशुगणना २०१७ मध्ये झाली होती. २०२२ मध्ये होणारी पशुगनणा कोविडमुळे आता होत आहे. २१ वी पशुगणना सप्टेंबर ते डिसेंबर २०२४ या कालावधीत होणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नियमित दर पाच वर्षांनी पशुगणना होत असते. मागील पशुगणना २०१७ मध्ये झाली होती. २०२२ मध्ये होणारी पशुगनणा कोविडमुळे आता होत आहे. २१ वी पशुगणना सप्टेंबर ते डिसेंबर २०२४ या कालावधीत होणार आहे.

या २१ व्या पशुगणनेत पशुपालकांनी पुढाकार घेऊन आपल्याकडील पशुधनाची नोंद ही आपल्याकडे येणाऱ्या प्रगणकांकडे व्यवस्थित न चुकता करायची आहे. या सर्व पशुधनाच्या आकडेवारीवरून धोरणात्मक निर्णय घेता येणार आहेत.

या पशुगणनेमध्ये आपल्याकडील सर्व पशुधन आणि कुक्कुटपक्षी याची नोंद घेतली जाणार आहे. पशुधनाची संख्या, प्रकार व लिंग, त्याचा वापर याबाबतची माहिती संकलित केली जाणार आहे. एकूण अर्थव्यवस्थेत पशुसंवर्धनचा वाटा खूप मोठा आहे.

अनेक कुटुंबांचे आर्थिक स्थैर्य यावर अवलंबून आहे. सोबत अनेकांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून आहे. सोबत अंडी, दूध याच्या माध्यमातून पोषक आहाराचा स्रोतदेखील उपलब्ध होत आहे. आगामी काळात पशुसंवर्धन क्षेत्राला फार मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे.

त्याला अनुसरून या व्यवसायाला उद्योग म्हणून मान्यतादेखील मिळत आहे. त्यासाठी अनुदानाच्या योजना 'राष्ट्रीय गोकुळ मिशन' सारख्या योजनेंतर्गत राबविल्या जात आहेत.

प्रजातीनिहाय, दूध उत्पादननिहाय एकूण पशुधन संख्येसोबत कुक्कुटपक्षी यांची संख्या कळली तर निश्चितपणे आपल्याला जादा दूध देणाऱ्या प्रजातींच्या संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करता येतील.

आपत्ती काळात नुकसानभरपाईबाबत नियोजन करता येईल. पशु छावण्या उघडायला लागू नयेत, ही इच्छा! पण वेळ पडली तर आपल्याकडे नेमकी पशुधन संख्या असेल तर काटेकोर नियोजन करता येईल.

अनेक योजना राबविताना या आकडेवारीचा आपल्याला उपयोग होणार आहे. परवा अचानक आलेल्या पाच रुपये दूध अनुदान योजनेवेळी सर्वांना झालेला त्रास आपल्या डोळ्यासमोर आहे.

अनेक तरुण मंडळी पशुसंवर्धनविषयक व्यवसायात आता उतरत आहेत. त्यामुळे या जनगणनेतून एकूणच त्यांचा कल काय आहे, हे कळेल. त्यांना नेमकी काय मदत करावी लागेल, याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मदत होईल.

अनेक मंडळी वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून आपापल्या व्यवसायात प्रगतीसाठी पुढाकार घेत आहेत. त्यांना मग अशा नेमक्या माहितीच्या आधारे मार्गदर्शन करणे सुलभ होणार आहे.

अशा अनेक कारणांसाठी सर्व पशुपालकांनी प्रगणकाला नेमकी माहिती देणे आवश्यक आहे. कुटुंबाचा तपशील, भटक्या श्वानांची संख्या, त्याचबरोबर गोशाळा यांचीदेखील नोंद होणार आहे.

डॉ. व्यंकटराव घोरपडे
सेवानिवृत्त सहायक आयुक्त, पशुसंवर्धन

अधिक वाचा: Colostrum : नवजात वासरांना किती आणि का पाजायचा चीक

Web Title: Pashu Ganana 2024 : Livestock farmers should register their livestock in livestock census for their prosperity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.