Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > चारा पिकांची लागवड करा आणि पैसे कमवा

चारा पिकांची लागवड करा आणि पैसे कमवा

Plant fodder crops and earn money | चारा पिकांची लागवड करा आणि पैसे कमवा

चारा पिकांची लागवड करा आणि पैसे कमवा

चाऱ्याचे भाव गगनाला पोहोचले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जनावरे सांभाळणेही परवडेना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वैरणीसाठी १०० टक्के अनुदान मिळत असल्याने ज्यांच्याकडे पाणी आहे, त्यांनी चारा पिकवून पैसा कमविण्याची संधीही आहे.

चाऱ्याचे भाव गगनाला पोहोचले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जनावरे सांभाळणेही परवडेना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वैरणीसाठी १०० टक्के अनुदान मिळत असल्याने ज्यांच्याकडे पाणी आहे, त्यांनी चारा पिकवून पैसा कमविण्याची संधीही आहे.

शेअर :

Join us
Join usNext

अहमदनगर जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खरीप हंगामावर तर परिणाम झाला होता. मात्र, रब्बी हंगामालाही कमी पावसाचा फटका बसत आहे. त्यातच पाऊस कमी झाल्यामुळे चाऱ्याचा तुटवडा आतापासूनच जाणवू लागला असून, चाऱ्याचे भाव गगनाला पोहोचले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जनावरे सांभाळणेही परवडेना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वैरणीसाठी १०० टक्के अनुदान मिळत असल्याने ज्यांच्याकडे पाणी आहे, त्यांनी चारा पिकवून पैसा कमविण्याची संधीही आहे.

मागील तीन वर्षे पावसाचे प्रमाण चांगले होते. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याच्या किमती फारशा वाढल्या नव्हत्या. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण विषम राहिले. काही ठरावीक तालुक्यांमध्येच पाऊस जास्त झाला, तर काही तालुक्यांमध्ये पाऊसच नाही. त्यामुळे खरीप हंगामाला तर फटका बसलाच, आता जनावरांच्या चाऱ्यासाठीही शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. चाऱ्याचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. हिवाळ्यातच जर हे भाव दुपटीने वाढले आहेत, तर उन्हाळ्यात तर परिस्थिती आणखीन बिकट होण्याची भीती आहे.

अधिक वाचा: रब्बी मका पिकाचे उत्पादन कसे वाढवाल?

वैरण पिकविण्यासाठी १०० टक्के अनुदान
पशुखाद्य व वैरण योजना ही शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणारी योजना आहे. शेतकऱ्यांना आर्थिक फायदा व्हावा व त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारायला मदत व्हावी, यासाठी शासनाने पशुखाद्य व वैरण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्याला १०० टक्के अनुदान मिळत आहे आणि या अनुदानाचा फायदा शेतकरी भरपूर प्रमाणात घेत आहे. मात्र, या योजनेचा फारसा प्रसार झाला नसल्याने, या योजनेचा लाभ शेतकऱ्यांकडून घेतला जात नाही.

चाऱ्याचे जिल्ह्यातील सध्याचे भाव
जिल्ह्यात चाऱ्याचा भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढले आहेत. उसाला प्रति टन तीन ते साडेतीन हजार रुपयांचे दर आहेत, तसेच उसाच्या वाढ्यांना सध्या पाचशे ते सातशे रुपये शेकड्यासाठी मोजावे लागत आहेत. ज्वारीच्या वैरणीला शेकड्याला तीन ते साडेतीन हजारांचा दर आहे. मका कूटचा भाव ५ हजार रुपये टनावर गेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रत्येक प्रकारच्या चाऱ्याच्या भावात दोन हजारांहून अधिकची वाढ झाली आहे.

कमी पाऊस झाल्यामुळे चाऱ्याची समस्या तर निर्माण होणारच होती. एकीकडे कमी पावसामुळे शेतकऱ्यांना फटका बसला, त्यातच कापसाला भाव नाही. आता चाऱ्याचेही भाव वाढल्यामुळे जनावरे सांभाळणेही कठीण झाले आहे. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. - मच्छिंद्र शिंदे, शेतकरी.

Web Title: Plant fodder crops and earn money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.