Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > लोकसंख्या वाढत आहे, पण पशुधन घटतेय

लोकसंख्या वाढत आहे, पण पशुधन घटतेय

Population is increasing, but livestock is decreasing | लोकसंख्या वाढत आहे, पण पशुधन घटतेय

लोकसंख्या वाढत आहे, पण पशुधन घटतेय

राज्यात पशुसंवर्धन विभागातर्फे पाळीव पशुंच्या गणनेचे काम पूर्ण झाले आहे. राज्यात पशुसंवर्धन विभागातर्फे पाळीव पशुंच्या गणनेचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या पाच वर्षांतील दुष्काळी परिस्थितीसह इतर कारणांमुळे २०१२ च्या तुलनेत राज्यात गायी-बैलांची संख्या ९.५४ टक्के घटली आहे.

राज्यात पशुसंवर्धन विभागातर्फे पाळीव पशुंच्या गणनेचे काम पूर्ण झाले आहे. राज्यात पशुसंवर्धन विभागातर्फे पाळीव पशुंच्या गणनेचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या पाच वर्षांतील दुष्काळी परिस्थितीसह इतर कारणांमुळे २०१२ च्या तुलनेत राज्यात गायी-बैलांची संख्या ९.५४ टक्के घटली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

अशोक डोंबाळे
सांगली : राज्यात पशुसंवर्धन विभागातर्फे पाळीव पशुंच्या गणनेचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या पाच वर्षांतील दुष्काळी परिस्थितीसह इतर कारणांमुळे २०१२ च्या तुलनेत राज्यात गायी-बैलांची संख्या ९.५४ टक्के घटली आहे. तसेच घोडा, गाढव, वराहांच्या संख्येत ३८ ते ४८ टक्क्यांपर्यंत घट आहे. या संबंधीचा अहवाल राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने प्रसिद्ध केला आहे.

शासनातर्फे दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते. २०१९ मध्ये सुरू केलेली पशुगणना पूर्ण झाली असून, नोव्हेंबर २०२३ मध्ये अंतिम अहवाल प्रसिद्ध झाला आहे. २०१२ मध्ये राज्यात गायी-बैलांची ग्रामीणमध्ये १ कोटी ५० लाख ८९ हजार ६५५ संख्या होती. २०१९ च्या पशुगणनेत ९.५४ टक्के घट होऊन १ कोटी ३६ लाख ४९ हजार १९५ झाली आहे. शहरात सर्वाधिक १३.०३ टक्क्यांनी घट आहे. ग्रामीणमध्ये ०.७३ टक्क्यांनी म्हशींची संख्या वाढली आहे. शहरामध्ये ७.६० टक्क्यांनी घट झाली आहे. ग्रामीण भागात मेंढ्यांची संख्या ४.०२ टक्क्यांनी वाढली असून, शहरात ४.३१ टक्क्यांनी घट आहे. शेळ्यांची संख्या ग्रामीणमध्ये २७.७३ टक्क्यांनी वाढली असून, शहरात ८.९० टक्क्यांनी घटली आहे. घोड्यांची संख्या ग्रामीणमध्ये ४८.२६ टक्क्यांनी, तर शहरात ५४.३९ टक्क्यांनी घटली आहे. खेचरची ग्रामीणमध्ये ८७.०२ टक्के घट, तर शहरात २३८८.२४ टक्के वाढ झाली आहे.

गाढवांची संख्या ग्रामीणमध्ये ३८.२३ टक्के, तर शहरात ४३.८६ टक्के घट झाली आहे. वराहांची संख्या ग्रामीणमध्ये ४८.८३ टक्के, तर शहरात ५४.९३ टक्के घट आहे. श्वानांची संख्या ग्रामीणमध्ये ३४.४५ टक्क्यांनी घटली असून, शहरात २१.९९ टक्के वाढ झाली आहे. कोंबड्यांची संख्या ग्रामीणमध्ये ३.८५ टक्के घट, तर शहरात २७.६५ टक्के घट आहे.

महाराष्ट्रात उंटांची संख्या वाढली
वाळवंटाचा राजा म्हणून ओळख असलेल्या उंटांच्या संख्येच्या बाबतीत महाराष्ट्राची मान उंच राहिली आहे. महाराष्ट्रात २०१२ च्या पशुगणनेत ग्रामीण भागात ११६ उंट होते. यामध्ये दुप्पट वाढ होऊन २०१९ च्या पशुगणनेत ३०० संख्या झाली आहे. २५८.६२ टक्क्यांनी उंटांची संख्या वाढली आहे. तीच परिस्थिती शहरी भागातही आहे. शहरात पूर्वी ६६ उंट असून, त्यात वाढ होऊन १६५ झाले आहेत. शहरातही १५० टक्क्यांनी उंट वाढले आहेत.

पाळीव प्राण्यांची ग्रामीणची संख्या

प्राणी२०१२२०१९ वाढ/घट (टक्के)
गाय-बैल१५०८९६५५१३६४९१९५▼ ९.५४ घट
म्हैस५२०९९९४५२४८५२८▲ ०.७३ वाढ
मेंढी२५३३९६१२६३५९१३▲ ४.०२ वाढ
शेळ्या७९७१८४२१०१८२६८६▲ २७.७३ वाढ
घोडा३०७८११५९२५▼ ४८.२६ घट
खेचर१९८८२५८▼ ८७.०२ घट
गाढव२१६०५१३३४५▼ ३८.२३ घट
उंट११६३००▲ १५८.६२ वाढ
डुक्कर२३२६८३११९०६०▼ ४८.८३ घट
कुत्रे१०७७८५६७०६४९२▼ ३४.४५ घट
कोंबड्या७५६९६१२०७२७७९५४०▼ ३.८५ घट

Web Title: Population is increasing, but livestock is decreasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.