Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > इंदापूरमधील फॉर्च्यून डेअरीचे उत्पादन स्थगित, आईस्क्रीमच्या कोनात बोट सापडल्याने ही डेअरी होती वादाच्या भोवऱ्यात

इंदापूरमधील फॉर्च्यून डेअरीचे उत्पादन स्थगित, आईस्क्रीमच्या कोनात बोट सापडल्याने ही डेअरी होती वादाच्या भोवऱ्यात

Production of Fortune Dairy in Indapur suspended | इंदापूरमधील फॉर्च्यून डेअरीचे उत्पादन स्थगित, आईस्क्रीमच्या कोनात बोट सापडल्याने ही डेअरी होती वादाच्या भोवऱ्यात

इंदापूरमधील फॉर्च्यून डेअरीचे उत्पादन स्थगित, आईस्क्रीमच्या कोनात बोट सापडल्याने ही डेअरी होती वादाच्या भोवऱ्यात

मुंबईत आइस्क्रीमच्या कोनात मानवी बोट सापडल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या इंदापूर तालुक्यातील फॉर्च्यून डेअरीचे उत्पादन तात्पुरते स्थगित

मुंबईत आइस्क्रीमच्या कोनात मानवी बोट सापडल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या इंदापूर तालुक्यातील फॉर्च्यून डेअरीचे उत्पादन तात्पुरते स्थगित

शेअर :

Join us
Join usNext

मुंबईत आइस्क्रीमच्या कोनात मानवी बोट सापडल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या इंदापूर तालुक्यातील फॉर्च्यून डेअरीचे उत्पादन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र, डेअरी सील करण्यात आलेली नाही. मालाड येथे यम्मो कंपनीच्या आइस्क्रीममध्ये मानवी हाताच्या बोटाचे पेर सापडल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. गाजियाबाद येथील ही कंपनी जयपूर लक्ष्मी डेअरी व इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर औद्योगिक वसाहतीमधील फॉर्च्यून डेअरीकडून आइस्क्रीम बनवून घेत होती, असे समोर आले आहे.

डेअरीचे भागीदार व संचालक सचिन जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, फॉर्च्यून डेअरी दररोज दोन ते अडीच लाख लिटर दुधाचे संकलन करते. दुधापासून भुकटी व बटर बनवण्यात येते. दि. १६ सप्टेंबर २०२३ पासून आमची कंपनी यम्मो कंपनीचे आइस्क्रीम बनवण्याचे काम करत आहे.

ती कंपनी यम्मो कंपनी अनेक कंपन्यांकडून आइस्क्रीम बनवून घेते. तसेच हडपसर येथील वाल्को इंडस्ट्रीजकडून आइस्क्रीम बनवून घेत असल्याने तेथील काही नमुने घेतले आहेत. इंदापूरसह इतरही काही युनिट आहेत. त्यांना एफएसएसआयने परवानगी दिली आहे.- सुरेश अन्नपुरे, सहआयुक्त, एफडीए (अन्न विभाग) पुणे विभाग

गाजियाबाद येथून हे आइस्क्रीम बनवून घेते. सदर कंपनीवर १२ जून २०२४ रोजी तक्रार झालेली आहे. त्यामुळे आइस्क्रीम बनवणाऱ्या कंपन्यांची परवानगी तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केल्याने उत्पादन होऊ शकत नाही; मात्र कंपनी सील केलेली नाही.

१५ जून रोजी एफएसआयची टीम व पोलिस पथकाकडून तपास सुरू झाला आहे. यम्मो कंपनीच्या ब्रँडला कुठेतरी बदनाम करण्याचा हा प्रयत्न असावा, असे आपणास प्रथमदर्शनी वाटते आहे, अशी प्रतिक्रिया जाधव यांनी दिली.

Web Title: Production of Fortune Dairy in Indapur suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.