Join us

अलीकडे का झाले अनेक दूध उत्पादकांचे डेअरी फार्म बंद?

By रविंद्र जाधव | Published: April 26, 2024 6:40 PM

दूध व्यवसायात कोणत्या गोष्टी चुकताहेत?

कोविडच्या सुमारास राज्यात दूध व्यवसायात मोठ्या प्रमाणात नवख्यांची लाट आली होती. मात्र अलीकडे काही महिन्यापूर्वी जस जसे दुधाचे दर कमी होत गेले. त्याच प्रमाणात दुग्ध व्यवसायातील अनेक दूध उत्पादक या व्यवसायातून बाहेर पडले. याची ज्याच्या त्याच्या दृष्टीने वेगवेगळी कारणे आहे. मात्र त्यातील काही महत्वाच्या बाबींचा विचार केला तर काही त्रुटी या सर्वांकडे सारख्याच आहेत. 

त्या कोणत्या आणि त्याचा दूध व्यवसाय बंद पडण्याशी काय संबंध आहे हे आपण आज या लेखातून जाणून घेऊया.  

गाई म्हशींचे आरोग्य : दूध व्यवसाय करतांना गोठ्यातील गाई म्हशींचे आरोग्य जोपासणे गरजेचे असते. अस्वछ पाणी आणि बुरशीजन्य चारा यामुळे गुरांना जंतांचा (कृमींचा) प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे वेळोवेळी पशूंचे जंतनिर्मूलन करणे देखील गरजेचे आहे. तसेच गोठ्यातील स्वच्छता राखणे हे देखील गरजेचे आहे. स्तनदाह (मस्टाटीस) सारखे आजार गोठ्यातील अस्वच्छतेमुळे गाई म्हशींना होतात. त्यामुळे मोठी आर्थिक हानी होते यासाठी सतत गोठाची स्वच्छता राखली तर विविध अडचणी पासून दूध उत्पादक दूर असतो. 

मुक्त संचार गोठा : दूध व्यवसाय करतांना बरेच पशुपालक गुरांना एकाच जागी दावणीला बांधून ठेवतात. ज्यात गुरे काही दिवस तर कधी काही महीने अगदी त्याच ठिकाणी असतात. अशावेळी त्या जनावरांची शारीरिक हालचाल मंदावते परिणामी दुध उत्पादन देखील घटते. यावर मुक्त संचार गोठा हा अतिशय प्रभावी उपाय आहे. यात जनावरे मुक्त फिरत असल्याने त्यांच्या शरीराचा परिपूर्ण व्यायाम होतो ज्यातूनआरोग्याची प्रतिकारशक्ती वाढल्याने जनावरे निरोगी राहतात.  

दुधाचे मूल्यवर्धन : अनेक शेतकरी बांधव दूध संकलन केंद्रावर दूध विक्री करतात. मात्र यात तो संबंधित संघ, तसेच दूध संस्था दूध उत्पादकांना अपेक्षित दर देत नाही. तेव्हा शेतकरी बांधवांनी दुधाचे मूल्यवर्धन करणे गरजेचे आहे. ज्यात दुधापासून दही, ताक, पनीर, लस्सी, बासुंदी, खवा, पेढा असे पदार्थ बनवून विक्री करता येते. यातील अनेक पदार्थांची वर्षभर मागणी असते व स्वच्छतेची हमी आणि पदार्थांची गुणवत्ता राखल्यास अधिकचा दर देखील मिळतो. तसेच परिसरात हॉटेल व्यवसायिकांना दूध विक्री करून देखील नफा मिळविता येतो. 

गाई म्हशींचे आरोगी, मुक्त संचार गोठा, दुधाचे मूल्यर्धन आदी बाबींचा दूध व्यवसायात वापर केल्यास निश्चितच दूध उत्पादक शेतकरी आनंदात राहील. तसेच आरोग्य पासून ते व्यवस्थापन यात देखील देखभाल करणे सोयीचे होईल. 

हेही वाचा - पती पत्नीचा दुग्ध जन्य पदार्थांचा उद्योग; अल्पावधीत घेतोय भरारी  

टॅग्स :दुग्धव्यवसायशेतकरीदूधगायशेती