Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Reshim Sheti : रेशीम किटक संगोपन करताना रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कमी खर्चाचे उपाय

Reshim Sheti : रेशीम किटक संगोपन करताना रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कमी खर्चाचे उपाय

Reshim Sheti : Low cost solutions to prevent the spread of diseases while rearing silkworms | Reshim Sheti : रेशीम किटक संगोपन करताना रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कमी खर्चाचे उपाय

Reshim Sheti : रेशीम किटक संगोपन करताना रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कमी खर्चाचे उपाय

Sericulture रेशीम कीटकांवर जिवाणू, विषाणू व बुरशीमुळे होणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो व प्रसार देखील झपाट्याने होतो. रेशीम कीटकांना रोग झाल्यानंतर तो पूर्णतः नियंत्रणात न येता बऱ्याच प्रमाणात रेशीम कीटक मरतात.

Sericulture रेशीम कीटकांवर जिवाणू, विषाणू व बुरशीमुळे होणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो व प्रसार देखील झपाट्याने होतो. रेशीम कीटकांना रोग झाल्यानंतर तो पूर्णतः नियंत्रणात न येता बऱ्याच प्रमाणात रेशीम कीटक मरतात.

शेअर :

Join us
Join usNext

रेशीम कीटकांवर जिवाणू, विषाणू व बुरशीमुळे होणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो व प्रसार देखील झपाट्याने होतो. रेशीम कीटकांना रोग झाल्यानंतर तो पूर्णतः नियंत्रणात न येता बऱ्याच प्रमाणात रेशीम कीटक मरतात.

Reshim Udyog रेशीम किटकास रोग होऊ नये यासाठी काळजी घेणे हाच एकमेव उपाय आहे. महाराष्ट्रात रेशीम कीटकास प्रामुख्याने खालील रोग होतात.

रेशीम किटक संगोपन करताना घ्यावयाची काळजी
▪️संगोपनगृहात प्रवेश करताना साबणाने हात पाय स्वच्छ धुवावे. संगोपनगृहात वेगळी चप्पल वापरावी.
▪️रेशीम किटकांची विष्ठा व खाल्लेली पाने गोळा करून संगोपनगृहापासून दूर अंतरावर कंपोस्ट खड्ड्यात टाकावी.
▪️वेळोवेळी रोगट अळ्या व पोचट कोष ट्रेमधून काढून टाकावे व सतत हात स्वच्छ धुवावे.
▪️आर्द्रता ९० टक्क्यांच्या वर असल्यास दररोज सकाळी तुती पाला टाकण्याच्या अर्धा तास अगोदर ट्रेमध्ये रेशीम कीटकांवर चुना धुरळणी करावी म्हणजे रोग प्रसार न होता बेड कोरडे राहण्यास मदत होते.
▪️२ टक्के डायथेन एम-४५ किंवा कॅप्टन २० ग्रॅम व केओलिन ९८० ग्रॅम मिक्स करून धुरळणी करावी.
▪️रेशीम कीटकावरील रोग नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य तापमान व आर्द्रता आवश्यक असते.
▪️ रेशीम कीटक कोषावर गेल्यानंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी प्लास्टिक चंद्रिकेवर कोष न करणाऱ्या अळ्या हातमोजे घालून हाताने वेचून घ्याव्यात व जमिनीत गाडून टाकाव्यात.
▪️कोष काढणी रेशीम कीटक कोषावर गेल्यानंतर कोष तयार झाल्याची खात्री करून ५ व्या दिवशी करावी.
▪️प्लास्टीक चंद्रिकेवर कोष करण्यासाठी सोडलेल्या अळ्यांच्या वरच्या बाजूस वर्तमान पत्राचे आच्छादन करावे म्हणजे रेशीम कीटक धागा वाया घालत नाही.
▪️प्लास्टीक ट्रे, चंद्रिका व इतर संगोपन साहित्य ६ x ४ x ३ फूट आकाराच्या सिमेंट काँक्रीटच्या हौदात ३० ग्रॅम चूना व ५०० ग्रॅम ब्लिचिंग पावडर १० लिटर पाण्यासोबत द्रावणात एक तास बुडवून ठेवावे म्हणजे निर्जंतुकीकरण होते व चंद्रिकेवरील रोगट धागा विरघळतो.
▪️संगोपनगृहाच्या दाराजवळ गोणपाटाचे पायदान ठेवून त्याला पाय पुसून आत ये जा करावी. आर्द्रता जास्त असल्यास ब्लिचिंग पावडर अधिक चूना मिश्रण शिंपडून घ्यावे.
▪️यशस्वी रेशीम कोष उत्पादनात ३८ टक्के वाटा उच्च प्रतीच्या तुती पाल्याचा असून ३७ टक्के संगोपन गृहातील तापमान व आद्रतेचा वाटा आहे.
▪️संगोपनगृहात २२ ते २८ सें. ग्रे. तापमान मर्यादित ठेवणे आवश्यक असून आर्द्रता किंवा तापमान जास्त झाल्यास रेशीम कीटक रोगास बळी पडतात व कोष उत्पादनात घट येते.

अधिक वाचा: आता स्ट्रॉ फेकून देण्याची गरज नाही; वडकशिवालेच्या कन्येने बनविली बाजरीची खाण्यायोग्य 'स्ट्रॉ'

Web Title: Reshim Sheti : Low cost solutions to prevent the spread of diseases while rearing silkworms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.