अनेकदा भात कापणीनंतर शेतकरी भाताचा पेंढा शेतात जाळताना दिसून येतात. पण, त्याने वायू प्रदुषण तर होतेच आणि तापमानवाढही होते. भाताचा पेंढा जाळण्यापेक्षा तो जनावरांना खायला चांगला असल्याचे तज्ञ सांगतात.
भारतात यंदा पावसाच्या कमतरतेमुळे हिरव्या चाऱ्याची टंचाई भासत आहे. देशात २३.४ टक्के कोरड्या चाऱ्याची, ११.२४ टक्के हिरव्या चाऱ्याची आणि २८.९ टक्के मिश्रण चाऱ्याची कमतरता आहे.
अशा परिस्थितीत जनावरांना भाताचा पेंढा चारा म्हणून दिल्यास चारा टंचाई तर भरून निघेलच शिवाय जनावरांचे दूध उत्पादनही वाढवता येते. कसे? जाणून घेऊया...
भाताच्या पेंढ्यात काय आहेत पौष्टीक गुणधर्म?
जर आपण भाताच्या पेंढ्यातील पोषक घटकांचे प्रमाण पाहिले तर त्यात नाममात्र पोषक घटक असतात. भाताच्या पेंढ्यात कोरडेपणा ९० टक्के आणि आर्दता १० टक्के असते.भाताच्या पेंढ्यात क्रूड प्रथिने फक्त ३ टक्के असते. तर फायबरचे प्रमाण ३० टक्के असते. १७ टक्क्यांपर्यंत सिलिका भाताच्या पेंढ्यांमध्येही आढळते.
केवळ भाताच्या पेंढ्यावर नका राहू निर्भर
जनावरांना केवळ भाताच्या पेंढ्यावर अवलंबून राहिल्यास त्याच्या पोषणाच्या गरजा भागवणे शक्य होत नाही.आजकाल गोठ्यातही भाताच्या पेंढ्याचा आधार घेऊन जनावरे पाळली जात आहेत. भाताचा पेंढा त्यांचे पोट भरू शकतो. पण त्यांना आवश्यक पोषण देऊ शकत नाही.
दुध वाढवण्यासाठी काय कराल?
भाताच्या पेंढ्याचे पौष्टीक मूल्य आणि पचनक्षमता वाढवण्यासाठी आणि फ्युसेरियम बुरशीपासून मुक्त होण्यासाठी, भाताच्या पेंढ्याला युरिया उपचारानंतरच खायला देण्याचा सल्ला दिला जातो. भाताच्या पेंढ्याला युरियासह प्रक्रीया करण्यासाठी प्रत्येक १०० किलोच्या मागे ३३ लिटर पाणी आणि ४ किलो युरिया खताची आवश्यकता असते.