Join us

शंभर टक्के अनुदानावर चारा लागवडीसाठी बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2023 9:34 AM

जिल्हा परिषदेच्या जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून चिपळूण पशुसंवर्धन विभागासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून १०० टक्के अनुदानावर मका, शुगर ग्रेझ व चवळी बियाणे उपलब्ध झाले आहे.

जिल्हा परिषदेच्या जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून चिपळूण पशुसंवर्धन विभागासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून १०० टक्के अनुदानावर मका, शुगर ग्रेझ व चवळी बियाणे उपलब्ध झाले आहे. तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपलब्ध झाले आहे.

यावर्षी पाऊस कमी प्रमाणात पडल्यामुळे काही जिल्ह्यामध्ये जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याचा तुटवडा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी गुरांसाठी हिरव्या चाऱ्याची लागवड करावी, असे आवाहन पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी व्ही. एस. बारापात्रे यांनी केले आहे.

ज्या पशुपालकांकडे जनावरे आहेत व हिरवी वैरण लागवडीसाठी जमीन व पाण्याची सोय आहे, अशा पशुपालकांसाठी रामपूर, सावर्डे, कापरे, कळकवणे, कुंभार्ली, तुरंबव, वहाळ व नांदगाव येथील जिल्हा परिषद पशुवैद्यकीय दवाखान्यात बियाणे उपलब्ध आहे. पशुपालकांनी मागणी अर्ज बरोबर तेथून मका, शुगर ग्रेझ व चवळी बियाणे घेऊन हिरव्या चान्यासाठी लागवड करावी, असे आवाहन गटविकास अधिकारी उमा घारगे, सहायक गटविकास अधिकारी भास्कर कांबळे, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) व्ही. एस. बारापात्रे यांनी केले आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यात बियाणे उपलब्ध असून त्यासाठी आधार कार्ड, सातबारा उतारा, रेशन कार्ड झेरॉक्स व एका फोटोसह संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :शेतकरीमकाचिपळुणपीकपाऊस