शेळी-मेंढीपालन हा उद्योग यशस्वी होण्यासाठी या पशुंच्या जातीची योग्य निवड आवश्यक असते. आपल्या देशात एकूण सुमारे २० शेळ्यांच्या जाती तसेच ४ मेंढ्याच्या जाती आहेत. यात मेंढ्याच्या देशी व विधेशी जाती आहेत त्या पाहूया.
मेंढीच्या उपयुक्त देशी जाती१) दख्खनी- महाराष्ट्र राज्याच्या कोरडवाहू प्रदेश आणि सभोवतालच्या आंध्रप्रदेश व कर्नाटकातील भागात या दख्खनी मेंढ्या आढळतात.- या जातीच्या मेंढ्या मांस व लोकर उत्पादनासाठी प्रसिद्ध असून लोकर ओबड-धोबड असते.- शरीरबांधा लहान मध्यम व काटक असतो.- शरीराचा रंग पांढरा, तपकिरी काळपट आढळतो.- मेंढ्या बिनशिंगी तर नरामध्ये शिंगे आढळतात.- जनावरांचे कान लहान असून खाली लोंबकळणारे असतात.- रोमन आकाराचे नाक असून मान आखूड व पात्तळ असते.- जनावराची छाती किंचित झुकलेली असते तर शेपटी आखूड असते.- नराचे शरीर वजन ३५ ते ४० किलो तर मादीचे वजन ३० किलो इतके आढळते.- लोकर ओबड-धोबड व काहीशी केसाळ असून उत्पादन ०.५ किलो प्रतिवर्षी इतकी आढळते.- दख्खनी मेंढीपासून मिळणाऱ्या लोकरीपासून प्रामुख्याने घोंगड्या, कांबळ तयार करतात.
२) नेल्लोर- या जातीच्या मेंढीचे मूळ स्थान आंध्रप्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील असून सध्या ही जनावरे नेल्लोर, गुड्डापा, गुंटूर, नालगोंडा हे जिल्हे आणि भोवतालच्या प्रदेशात प्रामुख्याने आढळतात.- भारतातील मेंढ्याच्या जातीमध्ये सर्वात जास्त उंची असणारी जनावरे नेल्लोर जातीचीच आहेत.- या जातीची शिंग पिळदार, वेटोळेयुक्त असतात.- लोंबकळनारे लांब कान, लांबट चेहरा असून प्रौढ जनावराचे शरीर वजन ३० किलो मादी व ४५ किलो नरचे आढळते.- नेल्लोर मेंढी मुख्यतः मटणासाठी प्रसिद्ध आहे.
३) माडग्याळ- सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात माडग्याळ या गावाच्या सभोवताली सिद्धनाथ, कवठे महांकाळ या भागात या मेंढ्या आढळतात.- दख्खनी मेंढ्यापेक्षा उंच, बाकदार नाक, लांब मान रंगाने पांढऱ्या असतात.- पूर्ण वाढ झालेल्या मेंढीचे वजन ४५ ते ५० किलो असते. मेंढ्यांच्या अंगावर लोकर कमी असते.
मेंढीची विदेशी जातमेरीनो- ही जात प्रामुख्याने लोकरीसाठी प्रसिद्ध आहे.- हिचे मूळ स्थान स्पेन देशातील असून विशेषतः ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत प्रामुख्याने आढळते.- मेरीनो मेंढ्या उच्च प्रतीच्या लोकरीसाठी प्रसिद्ध आहेत.- या मेंढ्यांची लोकर तेलकट असते.- नरापासून दरवर्षी १२ ते १५ किलो लोकरीचे उत्पादन मिळते.
अधिक वाचा: जनावराचे दुध उत्पादन वाढवून त्यांना निरोगी ठेवायचं मग तयार करा ह्या प्रकारचा गोठा