फायद्याचा शेळीपालन व्यवसाय करायचा असेल तर यात शेळ्या व पैदाशीच्या नराची निवड खूप महत्वाची आहे. शेळीपालनात शेळी व बोकड निवड करताना कोणते मुद्दे लक्षात घ्यावे ते सविस्तर जाणून घेवूया.
राज्यातील शेळ्यांच्या जातींचा विचार करता उस्मानाबादी ही मांसासाठी उपयुक्त असलेली आणि संगमनेरी ही मांस व दुधासाठी उपयुक्त असलेली जात आहे.
माद्यांची निवड करताना
१) पुढील पाय सरळ मागील पायाचे गुडघे कोणदार असावेत.
२) मागील पायात पुरेसे अंतर असावे, जेणेकरुन कास भरदार राहील.
३) कास मऊ, केस नसलेली, अर्धगोलाकार व पोटाला चिकटलेली असावी.
४) स्वभावाने गरीब व पिलांची चांगली काळजी घेणारी असावी.
५) नियमीत माजावर येवून दोन वर्षात तीन वेळा विणारी.
६) दुग्धोत्पादन चांगले असून शांतपणे पिलांना पाजणारी.
७) जुळे करडे देणारी मादीच शक्यतो निवडावी.
पैदाशीसाठी नराची निवड करताना
१) पैदाशीसाठी जुळ्यातील एक सुदृढ नर निवडावा.
२) पुढील पाय सरळ असावेत.
३) ओठ बारीक, नाकपुड्या मोठ्या असाव्यात.
४) डोळे पाणीदार असावेत.
५) मान जाड असावी तसेच मानेवर भरपूर आयाळ असलेला नर निवडावा.
६) छाती भरदार, पुढील दोन पायातली अंतर नऊ ईंचापेक्षा जास्त असावे.
७) दोन्ही वृषण व्यवस्थीत असावेत.
८) अंडकोष लोंबते नसावे.
९) नर चपळ, उत्तम पौरुषत्व असणारा असावा.
अधिक वाचा: Janavarantil Gochid : आपल्या गोठ्यात जनावरांना गोचीड होवू नयेत तर मग करा हे सोपे उपाय