सर्वसाधारणपणे महाराष्ट्रात मांसासाठीच शेळीपालन केले जाते. परंतू अजूनही याकडे कोणीही व्यवसायिक दृष्टीकोनातून पाहात नाही. शेळीपालनव्यवसायिक पद्धतीने केल्यास, ग्रामीण भागातील आर्थिक व सामाजिक स्थिती बदलण्याची क्षमता शेळीपालन व्यवसायात आहे.
करडांचे व्यवस्थापन
• करडु जन्मल्याबरेबर आईला चाटू द्यावे म्हणजे त्यांत मातृत्वाची भावना दृढ होते.
• नाकातील चिकट द्रव साफ करावा.
• करडांना अर्ध्या तासाचे आत चिक पाजावा.
• पंधरा दिवसानंतर थोडा वाळलेला चारा चघळु द्यावा.
• जोमदार वाढीसाठी (ईद करीता) ६० टक्के खाद्य व ४० टक्के चारा या प्रमाणात आहार द्यावा.
• सहा महिने वयात २० ते २५ किलोचे करडु विक्रीसाठी तयार होणे गरजेचे आहे.
पैदास नराचे व्यवस्थापन
• दिड वर्षापेक्षा कमी वयाचा नर पैदाशीसाठी वापरु नये.
• नर कायम कळपात ठेवू नये.
• पैदास हंगामात पोटावरील केस कापावेत.
• दोन नर पैदास हंगामात शक्यतो एकत्र ठेवू नयेत म्हणजे त्यांच्यात मारामारी होणार नाही.
• पैदास हंगामात नरांना सकस प्रथीनयुक्त आहार द्यावा जेणेकरुन त्यांची प्रजनन क्षमता वाढेल.
माद्यांचे व्यवस्थापन
• नऊ महिने ते एक वर्षापर्यंत माद्या वयात येतात.
• पैदास हंगामात मद्यांना सकस हिरवा चारा मिळेल याची काळजी घ्यावी.
• पैदास हंगामापुर्वी, गाभण काळातील शेवटच्या
• महिन्यात आहार व खाद्य वाढवावे, म्हणजे जुळ्यांचे प्रमाण वाढेल आणि वजनदार करडे जास्त मिळतील.
• गाभण व दुभत्या माद्यांच्या आहारात क्षार मिश्रणाचा वापर करावा.
• गाभण शेळ्या इतर कळपा पासुन वेगळ्या ठेवाव्यात.
• विलेल्या शेळीची काळजी घ्यावी, मागील भाग स्वच्छ धुवावा, सडे फोडावीत, करडू व्यवस्थीत पाजावे.
अधिक वाचा: Sheli Palan : शेळीपालनात करडांचा, शेळ्यांचा व बोकडांचा आहार कसा असावा.. वाचा सविस्तर