Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधालाच मिळणार अनुदान

सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधालाच मिळणार अनुदान

Subsidy will be available only for cow milk collected through cooperative milk unions | सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधालाच मिळणार अनुदान

सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधालाच मिळणार अनुदान

सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधाकरिता दूध उत्पादकास प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केली.

सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधाकरिता दूध उत्पादकास प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केली.

शेअर :

Join us
Join usNext

सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधाकरिता दूध उत्पादकास प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केली. ही योजना राज्यातील फक्त सहकारी दूध उत्पादक संस्थांमार्फत राबविण्यात येईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

विखे-पाटील यांनी याबाबत विधानसभेत निवेदन दिले. दूध व दुग्धजन्य पदार्थांचे भाव प्रामुख्याने मागणी व पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दूध भुकटी व बटरचे दर यावर अवलंबून असतात. त्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटी व बटरचे दर कमी झाल्यास दुधाचे दर कमी होतात. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी, त्यांना योग्य न्याय देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, लवकरच शासननिर्णय काढण्यात येईल, असे ते म्हणाले.

यापूर्वी राज्यातील अतिरिक्त दुधाचे नियोजन करण्यासाठी अनुदान योजना राबविली होती. त्यानुसार शासनाने शेतकऱ्यांचे अतिरिक्त दूध स्वीकारून त्याचे दूध भुकटी व बटरमध्ये रूपांतरण करून अतिरिक्त दुधाचा प्रश्न मार्गी लावला होता, याकडे मंत्री विखे-पाटील यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. दूध खरेदी दरवाढीचा मार्ग मोकळा सहकारी दूध संघांच्या माध्यमातून संकलित होणाऱ्या गाय दुधासाठी प्रतिलीटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील गाय दूध खरेदी दरवाढीचा मार्ग मोकळा झाला असून, गेली दोन महिने आर्थिक अरिष्टात सापडलेल्या दूध उत्पादकांना दिलासा मिळणार आहे.

अटी व शर्थी अशा
-
 जानेवारी ते २९ फेब्रुवारी २०२४ या काळासाठी योजना लागू राहील. त्यानंतर आवश्यकतेनुसार आढावा घेऊन मुदतवाढ देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
सहकारी दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर किमान २९ रुपये दूध दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर ऑनलाइन पद्धतीने अदा करणे बंधनकारक राहील. त्यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत ५ रुपये प्रतिलिटर बँक खात्यावर वर्ग करण्यात येतील.
डीबीटी करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्याच्या आधार कार्डशी व पशुधनाच्या आधारकार्डशी लिंक असणे आवश्यक असेल व त्याची पडताळणी करणे आवश्यक राहील.

अडचणीच्या काळात सरकारने चांगला निर्णय घेतला आहे. नेमका निर्णय कसा घेतला आहे, याबाबत स्पष्टता आल्यानंतर अधिक बोलणे उचित होईल. - योगेश गोडबोले (कार्यकारी संचालक, 'गोकुळ')

Web Title: Subsidy will be available only for cow milk collected through cooperative milk unions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.