Join us

उन्हाळा वाढतोय.. गायींचे दुध उत्पादन कसे वाढवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 1:44 PM

तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. जनावरे दुभत्या गायींना २१ ते २७ अंश सेल्सिअस तापमान योग्य समजले जाते. तापमान वाढल्यावर गायींवरील ताण देखील वाढतो. परिणामी दुग्ध उत्पादन आणि प्रजननावर परिणाम होतो.

सध्या तीव्र उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. जनावरे दुभत्या गायींना २१ ते २७ अंश सेल्सिअस तापमान योग्य समजले जाते. तापमान वाढल्यावर गायींवरील ताण देखील वाढतो. परिणामी दुग्ध उत्पादन आणि प्रजननावर परिणाम होतो. तो सुप्तावस्थेत असल्याने शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही.

१० ते २७ टक्क्यांपर्यंत दुग्धामध्ये घट होते. तापमान वाढते त्याप्रमाणात उष्माघातामुळे प्रजननावर परिणाम होतो. जनावरांना धाप लागणे, तोंडातून लाळ पडणे, ही तापमानवाढीची लक्षणे आहेत, जनावरांना झालेला त्रास समजवून घेणे आवश्यक आहे.

तापमानामुळे जनावरांना झालेल्या त्रासाचे तापमान आर्द्रता निर्देशांक हे मोजमाप आहे, गोठ्यातील हवेतील तापमान, आर्द्रता याचा 'इंडेक्स' काढला जातो. हे तंत्रज्ञान राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वीकारण्यात आले आहे. साधारण ६८, ७२ पर्यंतचा निर्देशांक योग्य समजला जातो. हा निर्देशांक वाढल्यास त्या आधारे जनावरांचे तापमानाची काळजी घ्यावे लागते.

शेतकऱ्यांनी प्रती गाई ११० ते १२० लिटर पाण्याची सोय करावी, यामध्ये ३० ते ४० लिटर पिण्यासाठी पाणी वापरावे. तसेच गोठ्या खेळती हवा ठेवावी, मुक्त संचार गोठा उपयुक्त आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर शेडनेटचा वापर करावा. तसेच फॉगर्स, फॅनचा वापर करून गोठ्यातील गरम हवा बाहेर काढावी.

पत्र्याचा गोठा असल्यास पत्र्यावर थंड पाण्याचे फॉगर्स बसवावे. पत्र्याच्या बाजुला बारदाना बांधून त्यावर ठिबकद्वारे पाणी सोडावे, यामध्ये चारा नियोजन देखील महत्त्वाचे आहे. १२ ते ३ हा तीव्र तापमानाचा काळ असतो, या कालावधीत जनावरांना कोणताही चारा, आहार देऊ नये. त्यांना आराम करू द्यावा.

सकाळी लवकर आणि संध्याकाळी उशिरा जनावरांना चारा द्यावा. उन्हामध्ये जनावरे चरण्यासाठी सोडू नये, जनावरांचा उन्हामध्ये ९९ टक्के संपर्क येऊ देऊ नये. पशुखाद्यात, जनावरांच्या आहारात इलेक्ट्रोलेट, मिनरल मिक्चरचा वापर करावा. १ टक्का मीठ वापरावे, अगदी गुळ पाण्याचा देखील वापर करावा.

डॉ. सोमनाथ मानेप्रमुख शास्त्रज्ञ, देशी गाई संशोधन व प्रशिक्षण केंद्र कृषि महाविद्यालय, पुणे

अधिक वाचा: दुष्काळ येईल अस वाटतंय; जनावरांसाठी कमी खर्चात मुरघास बनवून ठेवूया

टॅग्स :दुग्धव्यवसायशेतकरीदूधगायतापमान