Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Sonya Bull Success Story : 'सोन्या' बैलाचा बोलबाला; सोन्या बैलाने मालकाची किती केली कमाई? जाणून घ्या सविस्तर

Sonya Bull Success Story : 'सोन्या' बैलाचा बोलबाला; सोन्या बैलाने मालकाची किती केली कमाई? जाणून घ्या सविस्तर

Sunya Bull Success Story: 'Sunya' Bull dominates; How much did Sonya Bullock earn the owner? Know in detail | Sonya Bull Success Story : 'सोन्या' बैलाचा बोलबाला; सोन्या बैलाने मालकाची किती केली कमाई? जाणून घ्या सविस्तर

Sonya Bull Success Story : 'सोन्या' बैलाचा बोलबाला; सोन्या बैलाने मालकाची किती केली कमाई? जाणून घ्या सविस्तर

उंबराणी (ता. जत, जि. सांगली) येथील विद्यानंद चन्नापा आवटी यांच्या सोन्या बैलाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. (Sonya Bull Success Story)

उंबराणी (ता. जत, जि. सांगली) येथील विद्यानंद चन्नापा आवटी यांच्या सोन्या बैलाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. (Sonya Bull Success Story)

शेअर :

Join us
Join usNext

नितीन कांबळे

उंबराणी (ता. जत, जि. सांगली) येथील विद्यानंद चन्नापा आवटी यांच्या सोन्या बैलाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. कारणही तसेच आहे की हा सोन्या बैल आपल्या मालकाला लाखो रूपयांची कमाई करून देत आहे.

वय साडेचार वर्षे, वजन १२०० किलो. नाव सोन्या.देखभालीसाठी तीन गडी. खायला दोन किलो भरडा, चार डझन केळी, शंभर एमएल करडई तेल, मक्याचे कणीस, वैरण, रोज अर्धा तास फेरफटका. दररोज अंघोळ. दिसायला आडदांड असलेल्या 'सोन्या' बैलाचा राज्यासह परराज्यांत मोठा बोलबाला आहे. 

बीड येथील कृषी प्रदर्शनात आकर्षण ठरत असलेल्या सोन्याने दोन वर्षांत मालकाला ३० लाख रुपये कमवून दिले आहेत. उंबराणी (ता. जत, जि. सांगली) येथील विद्यानंद चन्नापा आवटी यांनी दोन वर्षांपूर्वी साडेचार लाख रुपयांना खिलार जातीचा बैल घेतला होता.  त्याचा लेकराप्रमाणे सांभाळ केला.

हा सोन्या आता साडेचार वर्षांचा झाला आहे. त्याने आजवर कर्नाटकात चार ठिकाणी कृषी प्रदर्शनांत सहभाग घेतला. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सोलापूर, कऱ्हाड, इंदापूर, सातारा, पुणे, विजापूर,  आष्टी यांसह अनेक ठिकाणी कृषी प्रदर्शनात हजेरी लावत मुख्य आकर्षण ठरला आहे.

सोन्याला सकाळी अर्धा तास फेरफटका मारावा लागतो. नंतर अंघोळ आणि मग दोन किलो भरडा, चार डझन केळी, १०० एमएल करडई तेल, मक्याची कणसे, वैरण असा दिवसभराचा आहार होतो. दोन वर्षांत त्याने ३० लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळवून दिले असून त्याने आर्थिक घडी बसवली आहे.

नैसर्गिक रेतनासाठी होतो वापर 

बीड येथील कृषी प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असलेला सोन्याला कृषी प्रदर्शनातच नाही, तर खिलार गाईचे नैसर्गिक रेतन करण्यासाठी देखील त्याचा वापर होत आहे. यातूनदेखील चांगला पैसा मिळत आहे. 

साडेचार लाखांचा सोन्या मागितला ४१ लाखांना

• साडेचार लाखांना घेतलेला सोन्या काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी ४१ लाख रुपयांना मागितला होता; पण मालकाने त्याला विकले नाही.

• ४१ लाख नव्हे ४१ कोटींना मागितला तरी आपण त्याला विकणार नसल्याचे मालक विद्यानंद आवटी यानी सांगितले. तसेच पोटच्या लेकरासारखा त्याला मी सांभाळला आहे.

• आजवर लाखो लोकांनी त्याला पाहिले आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी त्याला विकणार नसल्याचेदेखील आवटी यांनी सांगितले.

Web Title: Sunya Bull Success Story: 'Sunya' Bull dominates; How much did Sonya Bullock earn the owner? Know in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.