Join us

दुधाळ जनावरांची घ्या विशेष काळजी; पावसाळ्यात 'हा' आजार करतो मोठी आर्थिक हानी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 2:59 PM

वातावरणातील ओलावा वाढल्याने जीवाणूंची संख्याही मोठ्या संख्येने वाढते. परिणामी पावसाळ्यात जनावरांना विविध आजारांचे संक्रमण होते. (dairy disease in rainy season) यातीलच एक आजार म्हणजे कासदाह (Mastitis).

पावसाळ्यात जनावरांना विविध आजारांची (animal disease)बाधा होत असते. वातावरणातील ओलावा वाढल्याने जीवाणूंची संख्याही मोठ्या संख्येने वाढते. परिणामी पावसाळ्यात जनावरांना विविध आजारांचे संक्रमण होते. यातीलच एक आजार म्हणजे कासदाह (Mastitis).

दुधाळ जनावरांत आढळणार्‍या कासदाह या आजारात जनावरांचे दूध देणेच बंद होते. तसेच जनावरांच्या कासेला या आजारामध्ये संसर्ग होत असतो. कासेला जंतू संसर्ग झाल्याने, त्याचा दूध उत्पादनावर (milk production)विपरीत परिणाम होतो. ज्यामुळे जनावरांचे दूध उत्पादन कमी होते. 

कासदाह या आजारात जनावरांची कास दगडासारखी टणक होते म्हणून यांस 'दगडी' असेही म्हंटले जाते. कासदाह या आजारात पशुपालकांचे आर्थिक हानी देखील मोठ्या प्रमाणात होत असते. पशुपालकांच्या व्यवस्थापकीय चुकांमुळे कासदाह हा आजार होतो.

साधारणपणे दुधाळ जनावरांची धार काढल्यानंतर सडाचे छिद्र बंद होण्यास अर्धा ते एक तासाचा वेळ लागत असतो. सडाच्या उघड्या छिद्रातून कासदाहचे जीवाणू कासेत प्रवेश करत असतात. ज्यामुळे कासदाह आजार उद्भवतो.

कासदाह आजाराची लक्षणे 

• कासेला संसर्ग झालेल्या जनावरांच्या कासेतून दुधाच्या स्वरुपात गाठी यायला सुरुवात होते. • दुधाच्या रंगामध्ये फरक जाणवतो. • लालसर/घट्ट पिवळे दूध बाहेर येते. • कासेला सूज येते, कासेचे आकारमान वाढते. • जनावरांना ताप येतो. • चालता येत नाही. 

कासदाह होऊ नये यासाठी करा हे प्रतीबंधात्मक उपाय 

• जनावरांची, गोठ्याची नियमित स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे.• दुधाळ जनावरांची धार काढल्यानंतर आणि काढण्यापूर्वी कास स्वच्छ धुऊन, कोरडी करणे गरजेचं आहे. • सध्या बाजारात टीट डीप उपलब्ध आहे, धार काढल्यानंतर सड टीट डीपमध्ये बुडवून घ्यावी. • गायीला आटविताना कासेतून दूध पूर्णपणे काढून घ्यावे.• गायीला आटवताना सडातून इंट्राम्यॅमरी ट्युब पशुवैद्यकाच्या सल्ल्याने सोडावी. • धार काढण्यापूर्वी आणि धार काढल्यानंतर सड पोटाशियम परमॅग्नेटच्या पाण्याने धुवून घ्यावेत.

जनावरे बसण्याची जागा ओलसर, अस्वच्छ असल्यास कासदाहचे जीवाणू आत प्रवेश करतात. काही वेळेस कासेला जखम झालेली असल्यास, जखमेद्वारेही जीवाणू आत प्रवेश करत असतात. पावसाळ्यात जमिनी ओलसर राहिल्याने, पावसाळ्यात कासदाह होण्याचे प्रमाण वाढते. यावर उपाय म्हणून कासेची स्वच्छता महत्त्वाची आहे.

डॉ. श्रीकांत एम. खुपसेसहाय्यक प्राध्यापक, नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली, छत्रपती संभाजीनगर.

टॅग्स :दुग्धव्यवसायशेतकरीशेतीदूधगायशेती क्षेत्र