Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > बिबट्या पासून मेंढपाळांच्या संरक्षणासाठी वनविभागामार्फत तंबूचे कवच

बिबट्या पासून मेंढपाळांच्या संरक्षणासाठी वनविभागामार्फत तंबूचे कवच

Tent covers through forest department to protect sheep rearer from leopards | बिबट्या पासून मेंढपाळांच्या संरक्षणासाठी वनविभागामार्फत तंबूचे कवच

बिबट्या पासून मेंढपाळांच्या संरक्षणासाठी वनविभागामार्फत तंबूचे कवच

जुन्नर वनविभागात बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेता बिबट्या पासून नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी घरगोठ्यांभोवती सौर कुंपण, नेक बेल्ट इत्यादी अनेक उपाययोजना वनविभागामार्फत राबविण्यात येत आहेत.

जुन्नर वनविभागात बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेता बिबट्या पासून नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी घरगोठ्यांभोवती सौर कुंपण, नेक बेल्ट इत्यादी अनेक उपाययोजना वनविभागामार्फत राबविण्यात येत आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

ओतूर : जुन्नरवनविभागातबिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेता बिबट्या पासून नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी घरगोठ्यांभोवती सौर कुंपण, नेक बेल्ट इत्यादी अनेक उपाययोजना वनविभागामार्फत राबविण्यात येत आहेत.

याचाच एक भाग म्हणून उघड्यावर झोपणाऱ्या मेंढपाळाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे पाहून अमोल सातपुते, उपवनसंरक्षक जुन्नर यांनी त्यांच्यासाठी तंबूची संकल्पना मांडली.

वनविभागाने हे सुरक्षिततेचे पाऊल तत्काळ उचलले आहे. तंबूमुळे बिबट हल्ला, सर्पदंश तसेच पाऊस व थंडी यापासून मेंढपाळांचे संरक्षण होण्यासाठी मदत होईल असे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण म्हणाले.

शिरोली बु, आगर, नेतवड, ओझर, तेजेवाडी येथील बंडू केरळ डोमाळे, संतोष साळू टुले, अंकुश किसन बरकडे, नानासाहेब विठोबा सूळ, उत्तम चिमा खेमणर, गोरक्ष श्रीपत एरमाळ, अवलीराम सिद्धू बरकडे, सलू आप्पा कन्हे, राहुल सिद्धू बरकडे, दौलत सलू कन्हे, कचरू सूर्यभान सुडके, नारायण कान्हू सुडके, दत्तात्रेय कान्हू सुडके, भाऊसाहेब महप्पा धरम, सुभाष नामदेव बरकडे अशा एकूण १५ मेंढपाळांना तंबूचे वाटप उपवनसंरक्षक जुन्नर अमोल सातपुते यांच्या हस्ते करणेत आले.

यावेळी अनिता होले, वनपाल नारायणगाव, महेश बगाड, वनरक्षक ओझर, विकास मोरे, धोंडीभाऊ मोरे, विजय मोरे, अजित मोरे, तुषार मोरे, खंडू मोरे, रमेश मोरे, किसन जाधव उपस्थित होते.

तंबू कसा लावावा?
-
जुन्नर वनविभागातील मेंढपाळांना शासकीय निधी उपलब्ध करत मेंढपाळांना राहण्यासाठी तंबू खरेदी केले असून, मेंढपाळांना सदर वाटप करण्यात येत आहेत.
- प्रथमतः ८५ तंबू उपलब्ध झाले असून, ते मेंढपाळांना उपलब्ध करून दिले जातील, असे उपवनसंरक्षक जुन्नर अमोल सातपुते यांनी सांगितले.
- तंबू कसा लावावा व तो जास्तीत जास्त कसा टिकेल याचे प्रात्यक्षिक वनरक्षक रमेश खरमाळे, वनपाल नितीन विधाटे, जुन्नर देवीदास मिसाळ यांनी करून दाखवले.

Web Title: Tent covers through forest department to protect sheep rearer from leopards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.