Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > ७५ टक्के अनुदानावर सरकार देतंय दुधाळ जनावरे, कुठे कराल अर्ज?

७५ टक्के अनुदानावर सरकार देतंय दुधाळ जनावरे, कुठे कराल अर्ज?

The government is giving 75 percent subsidy for milch animals, where to apply? | ७५ टक्के अनुदानावर सरकार देतंय दुधाळ जनावरे, कुठे कराल अर्ज?

७५ टक्के अनुदानावर सरकार देतंय दुधाळ जनावरे, कुठे कराल अर्ज?

दारिद्रयरेषेखालील, अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, कधीपर्यंत करता येणार अर्ज?

दारिद्रयरेषेखालील, अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, कधीपर्यंत करता येणार अर्ज?

शेअर :

Join us
Join usNext

राज्यस्तरीय पशुसंवर्धन विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत अनुदानावर दुधाळ जनावरे वाटप केली जातात. सर्वसाधारण गटासाठी ५० टक्के, तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाला ७५ टक्के अनुदान दिले जात आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यास ९ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असून 

दरम्यान, यावर्षी १ हजार १३४ इतके लाभार्थी उद्दिष्ट असणार आहे. मात्र, गेल्या वर्षीच योजनेसाठी ५३ हजार अर्ज दाखल झालेले आहेत. पात्र अर्जदारांना अगोदर संधी दिली जाणार असून, ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

काय आहे योजना ?

■ पशुसंवर्धन विकासाला प्रवाहात आणण्यासाठी विभागामार्फत ७५ टक्के अनुदानापर्यंत दुधाळ जनावरांचे वाटप केले जाते.

■ गेल्यावर्षी दीड हजार नागरिकांना या योजनेचा लाभ घेता आला आहे.  या लाभाथ्र्यांना दहा शेळ्या, मेंढ्या किंवा गाय गटामध्ये दोन गायी वितरित करण्यात आल्या आहेत.

दुध व्यवसाय करताय? सरकार अनुदानावर देतंय दुधाळ गायी- म्हशी, जाणून घ्या सविस्तर...

७५ टक्के अनुदानावर मिळते दुधाळ जनावर

केंद्र शासनामार्फत या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला दुधाळ जनावरांसाठी ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. सर्वसाधारण प्रवर्गाकरिता ५० टक्के अनुदान आहे. योजनेसाठी गेल्यावर्षी देखील अर्जदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. परंतु, उद्दिष्ट संख्या कमी असल्याने अनेक पात्र अर्जदारांना योजनेचा लाभ घेता आला नाही.

पात्रतेचे निकष काय ?

पशुसंवर्धन विभागामार्फत सुरु असलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी जिल्ह्यातील पशुपालकांनी अर्ज करायचा आहे. पात्र अर्जदाराला पशुसंवर्धन विस्तार अधिकायांच्या उपस्थितीत जिल्हा किंवा राज्याबाहेरील पशू बाजारातून जनावरांची विक्री करून दिली जाते.

ऑनलाइन अर्ज कोठे कराल ?

योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून महाबीएमएस या वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज करायचा आहे. महिनाभराच्या आत पशुसंवर्धन विभागामार्फत पात्र अर्जदारांना दुधाळ जनावरांचे वाटप केले जाते.

कधीपर्यंत अर्ज करता येणार ?

  • ९ नोव्हेंबरपासून ऑनलाइन अर्ज घेण्याला सुरुवात झाली असून, महिनाभर अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.
  • योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, मागीलवर्षी दाखल झालेल्या ५३ हजार अर्जदारांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Web Title: The government is giving 75 percent subsidy for milch animals, where to apply?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.