मागील काही महिन्यांपासून राज्य सरकारच्या आदेशानंतर खासगी दूध संघांनी मनमानी पद्धतीने शेतकऱ्यांना कमी दर देण्याचा सपाटा लावला होता, याविरोधात दूध उत्पादक शेतक-यांनी राज्यभर मोठ्या प्रमाणात आंदोलने केली. यावर तोडगा काढत शासनाने दुधाला पाच रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले. मात्र, किचकट अटींमुळे दूध उत्पादक शेतकरी फेऱ्या मारून वैतागले आहेत. शासनाकडून घोषित करण्यात आलेल्या प्रतिलिटर पाच रुपये अनुदान प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या पशुधनाची माहिती संबंधित दूध संघ, दूध संस्था केंद्रचालक यांना सादर करावयाची आहे.
शासनाने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी दूध उत्पादक सभासद ज्या संस्थेस दूध पुरवठा करतात अशा दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून खालील सर्व कागदपत्रांची पूर्तता दूध संकलन केंद्रचालकांनी करून ती संघास सादर करावी लागत आहे. या कागदपत्रांची पूर्तता करण्यास दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नाव, बँकेचे नाव ( आधार कार्डशी लिंक असलेले) व शाखा, खाते क्रमांक, कोड तपशीलवार माहिती सोचत बँक पासबुकची प्रत व आधार कार्ड छायांकित प्रत, दूध उत्पादक शेतकऱ्यांकडील पशुधनांची संख्या, आधार कार्डशी लिंक असलेल्या पशुधन संख्येपैकी एअर टॅग केली पशुधन संख्या व एअर टॅग क्रमांक, पशुधन संख्येपैकी एअर टॅग न केलेली पशुधन संख्येची नोंद नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात करून एअर टॅग करून घेण्याची दूध उत्पादकांना सूचना करावी लागत आहे. हे सर्व ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने ते पुरते वैतागले आहेत.
भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी हवी
- या योजनेत सहभागी होणाऱ्या शेत-कांकडील दुधाळ जनावरांची नोंदणी एअर टॅग राज्यात भारत पशुधन पोर्टलवर असणे बंधनकारक राहील. शेतकऱ्यांचे आधार लिंक बँक खात्याची भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी करण्यात यावी.
- दूध उत्पादक शेतकऱ्याचे नाव, आधार कार्ड नंबर, संस्थेत दूध पुरवठा लिटर, बँकेचे नाव, शाखा खाते क्रमांक,आवएफसी कोड, पशुधन संख्या, एअर टॅग क्रमांक संस्थेने सभासद असलेल्या किंवा संस्थेस दूध पुरवठा करीत शेतकऱ्यांना पशुवैद्यकीय अधिकाप्यांशी संपर्क करणे याबाचत सूचना द्या.
- आपले आधार कार्ड सोबत त्यांच्याकडील उपलब्ध पशुधन संख्या एअर टॅग क्रमांकाची नोंद येऊन वरील तक्त्त्वात भरून ही माहिती संघास सादर करायची आहे.
- उपरोक्त माहिती प्राप्त न झाल्यास शासनाचे अनुदान प्राप्त होणार नाही, याची माहिती दूध उत्पादक शेतकऱ्यांना द्यावी, अशा सूचना आहे. मात्र पशुवैद्यकीय अधिकारी जनजागृती करताना दिसून येत नसल्याने बहुतांश दूध उत्पादक शेतकरी या अनुदाना पासून वंचित राहण्याची भीती आहे.
एअर टॅग म्हणजे काय?
- एअर टॅग म्हणजे गायींच्या कानाला लावण्यात येणारा पिवळा टॅग ज्यावर एक क्रमांक असतो. हा क्रमांक म्हणजे गायीचा आधार क्रमांक आहे, ज्यामध्ये गायीची जात (ब्रिड), टॅग नॉट होतानाचे वय, सोबत गायींच्या मालकाचे नाव व मोबाइल क्रमांक अशी सर्व माहिती असते.
- डॉक्टर दिवसरात्र धावपळ करून गावींना टॅग मारायला येताहेत. पण, शेतशिवारात गायींचे गोठे असल्याने त्या ठिकाणी मोबाइलला रेंज कमी असते. त्यातच सर्व्हर डाऊन झाल्यास माहिती अपूर्ण भरली जाते.-बाळासाहेब कापरे, पशुपालक शेतकरी