Join us

योजना दूध अनुदानाची, धसका बसतोय मात्र भेसळखोरांना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 10:35 AM

राज्य सरकारच्या दूध अनुदान योजनेमुळे दुधाची भेसळ रोखण्यात प्रथमच मोठ्या प्रमाणावर यश आले आहे. दूध संघांनी प्रत्येक उत्पादकाकडून खरेदी केलेले दूध आणि त्याचा केलेला विनियोग याचे खरे चित्र यानिमित्ताने समोर येत आहे.

शिवाजी पवारश्रीरामपूर : राज्य सरकारच्या दूध अनुदान योजनेमुळे दुधाची भेसळ रोखण्यात प्रथमच मोठ्या प्रमाणावर यश आले आहे. दूध संघांनी प्रत्येक उत्पादकाकडून खरेदी केलेले दूध आणि त्याचा केलेला विनियोग याचे खरे चित्र यानिमित्ताने समोर येत आहे.

त्यामुळे जिल्ह्यात भेसळ थांबली असून एकूण दूध संकलनात २० ते ३० टक्के घट झाल्याचे चित्र आहे. ही घट म्हणजेच तेवढी भेसळ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दूध अनुदान योजनेचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग केले जाणार आहे.

याकरिता दूध संघांना लिटरला २७ रुपये दर देण्याची सरकारकडून सक्ती करण्यात आली. त्याचबरोबर शेतकरी तसेच दुग्ध उत्पादकांकडून खरेदी केलेल्या दुधाची माहिती मागविण्यात आली. यापूर्वी केवळ संघांकडून होणाऱ्या दूध संकलनाची ढोबळ आकडेवारी दुग्ध व्यवसाय विकास विभागाकडे एकत्रित केली जात होती.

पशुवैद्यकीय विभागाने गायींच्या कानावर टॅग लावत एकप्रकारे त्यांचे आधारकार्ड यापूर्वीच तयार केले होते. त्याचा गायींचे लसीकरण व उपचारांसाठी विभागाला लाभ झाला होता. दूध अनुदान योजनेत त्याही पुढे जाऊन प्रत्येक गायींचे ब्रीड, वय, दुभत्या गायींची माहिती प्राप्त करून घेण्यात आली आहे. शेतकरी तसेच दुग्ध उत्पादकांनी दूध संघांना विक्री केलेल्या दुधाची इत्यंभूत आकडेवारीही जमा झाली.

जानेवारी ११ पासून योजनेची अंमलबजावणी सुरू होताच दूध संघांनी त्याचा धसका घेतला. संघांकडील दुधाचे संकलन आणि विनियोग याचा फुगा फुटण्याच्या भीतीने वास्तव आकडे यावेळी द्यावे लागणार होते. त्यामुळे आपोआपच भेसळ रोखली गेली. एकट्या नगर जिल्ह्यात अनुदान योजना सुरू होताच दुधाच्या एकूण संकलनात २० ते ३० टक्के घट झाली आहे.

त्यामुळे ही सर्व भेसळ थांबली असून सरकारच्या या विभागाच्याही हा प्रकार लक्षात आला आहे. गेली. एकट्या नगर जिल्ह्यात अनुदान योजना सुरू होताच दुधाच्या एकूण संकलनात २० ते ३० टक्के घट झाली आहे. त्यामुळे ही सर्व भेसळ थांबली असून सरकारच्या या विभागाच्याही हा प्रकार लक्षात आला आहे.

सर्व तपशील जमाहोल्सटीन फ्रिजियन ब्रीडचे सरासरी दूध उत्पादन २० लिटर गृहित धरले जाते. गीर व इतर गायींच्या दुधाचे सरासरी प्रमाण ८ ते १० लिटर मानले जाते. अशा प्रकारे जिल्ह्यातील एकूण गायींची संख्या, त्यांचे दूध उत्पादन आणि दूध संघांकडे होणारे संकलन तसेच पुढील विनियोगाचा तपशील प्राप्त झाला आहे.

अधिकारी काय म्हणालेदूध अनुदान योजनेच्या अंमलबजावणीपूर्वी जिल्ह्यातील एकूण दूध संकलन व नंतरच्या संकलनाची माहिती जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी गिरीश सोनवणे यांच्याकडे 'लोकमत'ने मागितली. त्यावर अद्याप सर्व संघांनी माहिती जमा केलेली नाही. आकडेवारी मिळाल्यानंतर चित्र स्पष्ट होईल. मात्र यानिमित्ताने भेसळ आपोआपच रोखली जाते, असे ते म्हणाले.

टॅग्स :दुग्धव्यवसायराज्य सरकारदूधशेतकरीगाय