राज्यात या जिल्ह्यात दूध उत्पादनात मोठी वाढ; दररोज १५ लाख लिटर दूध संकलन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 11:12 AM
जिल्ह्यात दुधाचे उत्पादन दोन लाखाने वाढले आहे. वर्षभरात दैनंदिन सरासरी १५ लाख लीटर दूध उत्पादन होते. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हे चार महिने दुधासाठी पुष्ठकाळ मानले जातात. यावर्षी पुष्ठकाळात जिल्ह्यात दुधाचे उत्पादन दहा ते पंधरा टक्क्याने वाढले आहे.