जन्माला आलेल्या बाळासाठी काही महिने तरी आईचे दूध हाच उत्तम आहार असतो. त्यानंतर बाळ जेव्हा साधारण सहा महिन्याचे होते, तेव्हा त्याला आईच्या दुधाव्यतिरिक्त वरचे हलके अन्न देण्यास सुरूवात केली जाते. अनेक ठिकाणी बाळाला पहिल्यांना अन्न भरविण्याचा ‘अन्नप्राशन’ समारंभ केला जातो. आपल्या जनावरांवर लहान मुलांप्रमाणेच प्रेम करणारे जे शेतकरी, पशुपालक असतात, तेही आपल्या गाई-बैलांसाठी सभारंभ करत असतात.
अशाच एका पशुपालकाने आपल्या वासरीसाठी अन्नप्राशन सभारंभ साजरा केला. त्यासाठी त्याने मोठा थाटमाट केलाच, शिवाय अनेक खाद्यपदार्थही व्यवस्थित सजवून वासरीपुढे ठेवण्यात आले होते. त्या वासरीला किशोरी असे नाव आहे.
बोलक्या डोळ्यांची ही वासरी अत्यंत गोंडस दिसते. सर्वप्रथम तिचे औक्षण करून नंतर दिला धान्य भरवले जाते. याशिवाय तिच्या पुढ्यात सजवलेल्या वाट्यांमध्ये विविध मिठाईही ठेवण्यात आली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. काऊलव्हर या अकाऊंटवरून तो शेअर करण्यात आला असून त्यातील व्यक्तींच्या पेहरावावरून तो उत्तरेकडील राज्यांतील असावा असा अंदाज आहे.
A post shared by gouvedik product (@gopalak_jay_gouvedik_product)
महाराष्ट्रातही अनेक पशुपालक शेतकरी गाई-बैलांचे लाड करताना दिसत असतात. कुणी त्यांचे वाढदिवस साजरे करतात, तर कुणी गाईच्या डोहाळेजेवणाचाही कार्यक्रम करताना दिसतात.