Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > सर्वात जास्त दूध देणारी ही शेळी ठरतेय शेळीपालनात फायद्याची

सर्वात जास्त दूध देणारी ही शेळी ठरतेय शेळीपालनात फायद्याची

This goat that gives the most milk is beneficial in goat farming | सर्वात जास्त दूध देणारी ही शेळी ठरतेय शेळीपालनात फायद्याची

सर्वात जास्त दूध देणारी ही शेळी ठरतेय शेळीपालनात फायद्याची

सानेन जातीची शेळी ठरतेय फायद्याची

सानेन जातीची शेळी ठरतेय फायद्याची

शेअर :

Join us
Join usNext

मांस आणि दूध उत्पादांनासाठी अनेक शेतकरीशेळीपालन करतात. शेतकरी बांधवांच एटीएम असलेल्या शेळीपालनात अलीकडे सानेन शेळी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सानेन ही सर्वाधिक दूध उत्पादक शेळी असून स्वित्झर्लंड मधील सानेन व्हॅलीमधून उगम पावलेली आहे.

सानेन शेळी त्यांच्या आकर्षक पांढर्‍या रंगासाठी आणि विविध हवामानाशी जुळवून घेण्याच्या क्षमतेसाठी ओळखली जाते. ज्यामुळे सानेन शेळी जगभरातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक लोकप्रिय पर्याय होत आहे. 

दूध उत्पादनात सानेन शेळ्या दररोज सरासरी ३  लिटर पर्यंत दूध देते. ज्यात फॅटचे प्रमाण सुमारे ३-४% असते. ज्यामुळे ही शेळी उच्च-गुणवत्तेत दुधाची विश्वसनीय शेळी झाली आहे. 

सानेन जातीच्या शेळी चा गाबन काळ नेहमीच्या शेळ्यांप्रमाणेच पाच महिन्यांचा असतो. या शेळी पासून एका वेतात कधी दोन तर कधी तीन करडे मिळतात. तसेच इतर गावठी शेळ्यांच्या तुलनेत गाभण राहण्याचे या जातीचे प्रमाण अधिक आहे.

सानेन जातींच्या शेळ्यांचे काही प्रमुख वैशिष्ट्ये

  • या जाती कोणत्याही प्रकारच्या हवामानात सहज तग धरू शकतात.
  • ज्वारीचा कडबा, मका, अशा पारंपरिक चार्‍यावर देखील या शेळ्यांचे पालन करता येते.
  • सर्व प्रकारच्या खाद्याचे, गवताचे आणि अपारंपरिक खाद्याचे दूध, मांसआणि कातडी मध्ये रूपांतर उत्तम पद्धतीने करतात.
  • या शेळ्यांची  रोग प्रतिकार शक्ती चांगली असून विविध आजरांस लवकर बळीपडत नाही.
  • शेळ्या दुरवर रानात, डोंगर कपाऱ्यात करण्यास जाऊ शकतात. तसेच कमीत कमी भांडवली गुंतवणूक व्यवस्थापन करणे सहज शक्य असते.
  • कोणत्याही वातावरणाशी समरस होण्याची नैसर्गिक क्षमता असल्यामुळे कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या निवाऱ्याची गरज नसते.

 

Web Title: This goat that gives the most milk is beneficial in goat farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.