केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील पशुधनास प्रतिबंधत्माक उपाययोजनेचा भाग म्हणून करण्यात येणाऱ्या लसीकरणाचे कालबद्ध वार्षिक वेळापत्रक एकत्रितरित्या निर्गमित करणे आवश्यक आहे.
आयुक्त पशुसंवर्धन, पुणे यांच्या उपरोल्लेखित दि. ०४.०२.२०२१ रोजीच्या परिपत्रकामुळे होणारी व्दिरुक्ती टाळण्यासाठी सदर परिपत्रक अधिक्रमित करुन राज्यात करण्यात येणाऱ्या लसीकरणाचे वार्षिक कालबध्द वेळापत्रक व सदर वेळापत्रक राबविण्यासाठीच्या एकत्रितरित्या मार्गदर्शक सूचना क्षेत्रीय संस्था/अधिकारी स्तरावर उपलब्ध करण्यात येत आहेत.
पशु-पक्षांमधील विविध रोग प्रादुर्भावांवर नियंत्रण मिळविण्यासाठी काही विशिष्ट औषधींचा तसेच निरोगी पशुधनामध्ये रोग प्रादुर्भाव होवु नये म्हणुन तात्काळ लसीकरण करणे आवश्यक असते.
राज्यात अचानक उद्भवणारे विविध रोग प्रादुर्भाव व त्यावर वेळीच प्रभावी नियंत्रण करणे सुलभ होण्याच्या अनुषंगाने क्षेत्रिय स्तरावरील अधिकारी कर्मचारी यांनी पशु-पक्षांमधील विविध रोगांकरीता करावयाच्या लसीकरणाचे वेळापत्रक व तपशिलाबाबत पुढील लिंकवर क्लिक करा.
पशुनिहाय लसीकरणाचे वेळापत्रक: https://shorturl.at/BGJN0