Join us

डेअरी उद्योग सुरु करायचाय ? इथे मिळेल प्रशिक्षण

By बिभिषण बागल | Published: July 30, 2023 9:00 AM

ए.आय.सी - ए.डी.टी बारामती फाउंडेशन (नीती आयोगाचा एक उपक्रम आणि अटल इनोव्हेशन मिशन द्वारे समर्थित) सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डेअरी (एक इंडो- डच उपक्रम) यांच्या संयुक्त विद्यमाने "डेअरी उद्योजकता विकास कार्यक्रम" आयोजित करत आहे यासाठी प्रशिक्षणार्थींची नोंदणी सुरु आहे.

ए.आय.सी - ए.डी.टी बारामती फाउंडेशन (नीती आयोगाचा एक उपक्रम आणि अटल इनोव्हेशन मिशन द्वारे समर्थित) सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डेअरी (एक इंडो- डच उपक्रम) यांच्या संयुक्त विद्यमाने "डेअरी उद्योजकता विकास कार्यक्रम" आयोजित करत आहे यासाठी प्रशिक्षणार्थींची नोंदणी सुरु आहे.कार्यक्रमाची वैशिष्ट्ये 

  • नेदरलँड्स, इस्त्राईल आणि ब्राझीलमधून पशुसंवर्धन आणि दूध आणि दूध प्रक्रिया या विषयावर प्रशिक्षित केलेल्या आमच्या तज्ञांची सत्रे.
  • आमच्या जागतिक दर्जाचे गायी-म्हशींचे गोठे आणि डेअरी प्रोसेसिंग युनिटला भेटी.
  • पशूंचे पोषण आहार तपासणी, इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (IVF), कृत्रिम रेतन आणि पशूंचे रोग निदान अशा अत्याधुनिक प्रयोगशाळांना भेट.
  • २० पेक्षा जास्त दुग्धजन्य पदार्थांवर प्रक्रिया करण्याचा अनुभव.
  • कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल सहभागींना नीति आयोग आणि अटल इनोव्हेशन मिशन लोगो असलेले प्रमाणपत्र जे प्रकल्प अहवाल आणि अनुदान योजनांमध्ये फायदेशीर ठरु शकते.
  • जेवण आणि राहण्याची व्यवस्था.

मर्यादा: फक्त २० प्रशिक्षणार्थीप्रशिक्षण शुल्क: ₹५०००/- (जेवण, राहण्याची सोय व GST सहित)

निवडीचे निकष१) कृषी पदवीधर.२) फूड टेक विद्यार्थी.३) इतर शैक्षणिक प्रवाहातील इच्छुक विद्यार्थी.४) शेतकरी.५) तरुण उद्योजक.६) महिला/पुरुष बचत गट

कार्यक्रमाचा कालावधी: २१ ऑगस्ट, २०२३ ते २३ ऑगस्ट, २०२३ (३ दिवस)वेळ: सकाळी १०:०० ते संध्याकाळी ५:०० पर्यंत

नोंदणी शुल्क भरण्यासाठी व थेट नोंदणी आणि पेमेंट संबंधित प्रश्नांसाठी संपर्क: अभिषेक गिते ९५१८९७६०३४ऑनलाईन नोंदणीसाठी लिंक:https://forms.gle/BuNd6w4Nuo225GdP8 

टॅग्स :दुग्धव्यवसायशेतकरीमहिलादूधबारामती