Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > म्हशीमधील उरमोडी, मृदूअस्थी आजार कशामुळे होतो व त्यावर काय करावे उपाय?

म्हशीमधील उरमोडी, मृदूअस्थी आजार कशामुळे होतो व त्यावर काय करावे उपाय?

What causes Osteoporosis disease in buffaloes and what can be done to treat it? | म्हशीमधील उरमोडी, मृदूअस्थी आजार कशामुळे होतो व त्यावर काय करावे उपाय?

म्हशीमधील उरमोडी, मृदूअस्थी आजार कशामुळे होतो व त्यावर काय करावे उपाय?

म्हैशीमध्ये उरमोडी हा आजार ज्याला मृदूअस्थी म्हणतात तो मोठ्या प्रमाणात आढळून येतो. गमतीचा भाग म्हणजे तो बरा करण्यासाठी अनेक ठिकाणी अशा म्हशींना केळीच्या खुंटावर लोळवणे, उकिरड्यात लोळवणे असे प्रकार देखील करणारी मंडळी आहेत.

म्हैशीमध्ये उरमोडी हा आजार ज्याला मृदूअस्थी म्हणतात तो मोठ्या प्रमाणात आढळून येतो. गमतीचा भाग म्हणजे तो बरा करण्यासाठी अनेक ठिकाणी अशा म्हशींना केळीच्या खुंटावर लोळवणे, उकिरड्यात लोळवणे असे प्रकार देखील करणारी मंडळी आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

म्हैशीमध्ये उरमोडी हा आजार ज्याला मृदूअस्थी म्हणतात तो मोठ्या प्रमाणात आढळून येतो. गमतीचा भाग म्हणजे तो बरा करण्यासाठी अनेक ठिकाणी अशा म्हशींना केळीच्या खुंटावर लोळवणे, उकिरड्यात लोळवणे असे प्रकार देखील करणारी मंडळी आहेत.

या आजारात मुळातच म्हशींना उठता येत नाही. पुढील पायाच्या गुडघ्यावर वाकून उभे राहतात. छातीचा भाग उचलता येत नाही. म्हशी आखडून व हळुवार चालतात. पाठ वाकडी होते. या मागच्या कारणांचा विचार न करता अशा म्हशींना अंग ढिले करण्यासाठी लोळवणे, डागणे असे प्रकार केले जातात.

उरमोडी आजार कशामुळे होतो?
◼️ ज्यादा दूध देणाऱ्या म्हशींमध्ये व्याल्यानंतर सहा ते आठ महिन्यात या रोगाची लक्षणे दिसून येतात.
◼️ अनेक वेळा गाभण म्हशीत देखील हा रोग आढळून येतो. गाईमध्ये हा रोग कमी प्रमाणात आढळतो.
◼️ शरीरातील फॉस्फरस (स्फुरद) या खनिज घटकाच्या कमतरतेमुळे हा रोग मोठ्या प्रमाणात दिसून येतो.
◼️ मुळातच सर्वच भागात मोठ्या प्रमाणात जमिनीत फॉस्फरस ची कमतरता आहे.
◼️ त्यामुळे अशा जमिनीत घेतलेल्या चारा पिकात फॉस्फरस ची कमतरता निर्माण होते.
◼️ ज्यावेळी असा चारा जनावरांना दिला जातो त्यावेळी त्यांच्यात देखील फॉस्फरसची कमतरता निर्माण होते.
◼️ आजही आपण जनावरांना आहार देताना काळजी घेत नाही. चाऱ्याचे नियोजन करत नाही.
◼️ पावसाळ्यात फक्त हिरवा चारा पुन्हा उन्हाळ्यात कडबा, बाजरीचे सरमड, वाळलेले गवत देतो.
◼️ त्यामुळे शरीरात फॉस्फरसची कमतरता मोठ्या प्रमाणात निर्माण होते आणि या रोगाला जनावरे बळी पडतात.
◼️ जनावरांना नियमित जो काही फॉस्फरस पशुखाद्य, चारा यातून मिळतो तो दुधावाटे आपण नियमित काढून घेत असतो.
◼️ साधारण एक लिटर दुधातून एक ग्रॅम फॉस्फरस बाहेर पडतो. त्यासाठी दोन ग्रॅम फॉस्फरस आहारातून मिळायला हवा. पण तो मिळत नाही. मग उरमोडी ची लक्षणे दिसायला लागतात.

काय दिसतात लक्षणे
◼️ दूध उत्पादनासाठी, रक्तातील फॉस्फरस चे प्रमाण टिकवण्यासाठी जर आहारातून फॉस्फरस मिळाला नाही तर मग हाडातून फॉस्फरस हा घटक शोषला जातो. त्यामुळे हाडे ठिसूळ होतात.
◼️ म्हशींचे खाणे पिणे हळूहळू कमी होते.
◼️ दूध कमी देतात.
◼️ नीट उभे राहता येत नाही.
◼️ गुडघ्यावर येऊन थांबतात व प्रत्यक्ष तशाच अवस्थेत गोठ्यात वैरण खाताना दिसतात.
◼️ जनावर आखडून लंगडत चालते.

काय कराल उपाय?
◼️ या रोगावर नेमका उपाय म्हणजे नेहमीच चांगल्या कंपनीचे खनिज मिश्रण मोठ्या प्रमाणामध्ये देणे आवश्यक आहे.
◼️ लक्षणे दिसत असताना साधारण १०० ते १५० ग्रॅम खनिज मिश्रण दोन महिने द्यावीत.
◼️ नंतर नियमितपणे ६० ते ७० ग्रॅम खनिज मिश्रण खुराकातून देणे अत्यंत आवश्यक आहे.
◼️ सोबत इतर फॉस्फरसयुक्त काही औषधे, इंजेक्शन बाजारात मिळतात ती पशुवैद्यकांच्या सल्ल्याने द्यावीत.
◼️ नियमित दूध उत्पादनानुसार खनिज मिश्रणे योग्य प्रमाणात द्यावीत.
◼️ दूध उत्पादनानुसार खुराक द्यावा गाभण काळाच्या शेवटच्या टप्प्यात देखील खुराक बंद करू नये.
◼️ हिरवा चारा विशेष करून द्विदल चारा दिल्यास हा आजार आपण टाळू शकतो हे निश्चित.

डॉ. व्यंकटराव घोरपडे
सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली

अधिक वाचा: गाय व म्हैस व्याल्यानंतर कासेवर सुज कशामुळे येते? काय कराल उपाय? वाचा सविस्तर

Web Title: What causes Osteoporosis disease in buffaloes and what can be done to treat it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.