Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > गाई-म्हशीमध्ये गर्भाशयाचा पीळ म्हणजे नक्की काय आणि हे कशामुळे होते वाचा सविस्तर

गाई-म्हशीमध्ये गर्भाशयाचा पीळ म्हणजे नक्की काय आणि हे कशामुळे होते वाचा सविस्तर

what exactly is uterine torsion in cows and buffaloes and what causes it Read in detail | गाई-म्हशीमध्ये गर्भाशयाचा पीळ म्हणजे नक्की काय आणि हे कशामुळे होते वाचा सविस्तर

गाई-म्हशीमध्ये गर्भाशयाचा पीळ म्हणजे नक्की काय आणि हे कशामुळे होते वाचा सविस्तर

आपल्याकडे आता मोठ्या प्रमाणात गाई, म्हशी व्यायला सुरुवात होईल. अनेक वेळेला त्यांच्या गर्भाशयाला पीळ uterine torsion पडण्याच्या घटना समोर येतात. त्यामुळे पशुपालकांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होते.

आपल्याकडे आता मोठ्या प्रमाणात गाई, म्हशी व्यायला सुरुवात होईल. अनेक वेळेला त्यांच्या गर्भाशयाला पीळ uterine torsion पडण्याच्या घटना समोर येतात. त्यामुळे पशुपालकांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होते.

शेअर :

Join us
Join usNext

आपल्याकडे आता मोठ्या प्रमाणात गाई, म्हशी व्यायला सुरुवात होईल. अनेक वेळेला त्यांच्या गर्भाशयाला पीळ पडण्याच्या घटना समोर येतात. त्यामुळे पशुपालकांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होते. अलीकडे या घटना खूपच वाढत आहेत.

यामुळे प्रसूतीदरम्यान गंभीर अडचणी व गुंतागुंत होऊ शकते. साधारणपणे गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यात प्रसूती जवळ येते. त्यावेळेला गर्भाशयाला पीळ पडल्याचे लक्षात येते. त्यामुळे वासरू, रेडकू बाहेर पडण्याचा मार्ग बंद होतो. वेळीच उपचार जर केला नाही तर गाई, म्हशींचा मृत्यू देखील ओढावू शकतो.

गर्भाशयाला पीळ पडण्याची कारणे
१) गोठ्यामध्येच गाभण जनावरे बांधून ठेवल्यामुळे त्यांना थोडा देखील व्यायाम मिळत नाही. अशावेळी देखील गर्भाशयाला पीळ पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
२) गोठ्याची रचना, गोठ्यामधील चढ-उतार, त्याचबरोबर आपल्याकडे फॉस्फरस या खनिज द्रव्याची कमतरता खूप मोठी आहे. त्यामुळे देखील गर्भाशयाचे स्नायू शिथिल झाल्यामुळे गर्भाशयाला पीळ पडण्याचे प्रकार आपल्याकडे दिसून येतात.
३) अनेक वेळेला शेवटच्या टप्प्यातील गाभण जनावरे गोठ्यात रवंथ करत बसल्यानंतर अपरिचित व्यक्तीने गोठ्यामध्ये प्रवेश केला, मोठा आवाज झाला तर जनावरे बुजतात व तत्काळ धडपडून उठण्याचा प्रयत्न करतात. हेही एक कारण आहे.

गर्भाशयाला पीळ पडल्याची लक्षणे
गर्भाशयाला पीळ पडल्यानंतर जनावर अस्वस्थ होते. वैरण कमी खाते.
जमिनीवर पाय आपटणे, पोटावर मागील पाय मारणे, वारंवार गोठ्यात आडवे पडणे व तत्काळ उठणे, वारंवार कळा देऊन जनावर दमून जाते.
अनेकवेळा कास भरते व पुन्हा मोकळी होते. अशा प्रकारची लक्षणे दिसायला सुरुवात होतात.

तपासणी व निदान
गर्भाशया पीळ पडला आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून त्याची तपासणी होणे अत्यंत आवश्यक आहे.
गुदाशयामध्ये हात टाकून गर्भाशयाची तपासणी केल्यानंतर गर्भाशयाला किती प्रमाणात पीळ पडला आहे, याचे निदान होऊ शकते.
त्यानुसार तज्ज्ञ पशुवैद्यक बाह्य योनीमार्गात हात घालून पीळ डाव्या बाजूला आहे की उजव्या बाजूला आहे, हे तपासून आपल्या उपचाराची दिशा ठरवत असतात.

उपचार
१) सौम्य व मध्यम प्रमाणात जर पीळ असेल तर अशा वेळेला जनावरांना पाय बांधून पलटी मारल्यास असा पीळ तत्काळ सुटू शकतो व प्रसूती सुलभ होऊ शकते.
२) जनावरांना पलटी मारत असताना गर्भाशय स्थिर ठेवणे त्याचबरोबर त्यासाठी लाकडी फळीचा वापर करणे हे कौशल्याचे काम आहे. त्यासाठी तज्ज्ञ पशुवैद्यकाचीच मदत घेणे अत्यंत आवश्यक आहे.
३) तीव्र स्वरूपाचा पीळ असेल तर अशावेळी शस्त्रक्रिया करून वासरू किंवा रेडकू हे काढावे लागते.
४) गाभण गाई, म्हशींना योग्य प्रकारचा हलका व्यायाम आणि योग्य व्यवस्थापनातून आपण निश्चितपणे जनावरांच्या गर्भाशयाला पीळ पडणे थोपवू शकतो.
५) हालचालीसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देणे, संतुलित व पुरेसा आहार आणि खनिज मिश्रणाचा नियमित वापर केला तर गर्भाशयाचा पीळ आपण टाळू शकतो.
६) उपचारानंतर देखील त्याची योग्य काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.

डॉ. व्यंकटराव घोरपडे
सेवानिवृत्त सहायक आयुक्त, पशुसंवर्धन

अधिक वाचा: Pashu Ganana 2024 : पशुपालकांनी आपल्या उन्नतीसाठी पशुगणनेत पशुधनाची नोंद न चुकता करा

Web Title: what exactly is uterine torsion in cows and buffaloes and what causes it Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.