Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > आमच्या दुधाला कोण देणार ५ रुपये अनुदान? मराठवाड्यातील शेतकरी विवंचनेत 

आमच्या दुधाला कोण देणार ५ रुपये अनुदान? मराठवाड्यातील शेतकरी विवंचनेत 

Who will give Rs 5 subsidy to our milk? Farmers in Marathwada are in trouble | आमच्या दुधाला कोण देणार ५ रुपये अनुदान? मराठवाड्यातील शेतकरी विवंचनेत 

आमच्या दुधाला कोण देणार ५ रुपये अनुदान? मराठवाड्यातील शेतकरी विवंचनेत 

दुध अनुदानाचा पेच काही सूटेना...

दुध अनुदानाचा पेच काही सूटेना...

शेअर :

Join us
Join usNext

रविंद्र शिऊरकर

घरच्या दुधाची गरज भागवत, चाऱ्या पाण्याचा खर्च निघावा ही कोणत्याही दुधव्यवसायिकाची साधारण गरज. यापुढे जाऊन दूध व्यवसायालाचं मुख्य व्यवसाय म्हणून बघणे हे अद्याप मराठवाड्यातील शेतकऱ्यांना फारसं न रुजलेलं. मुख्य शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टीकोनच अधिक. ग्रामीण भागातील अपुरी नोकरीच्या गरजा आणि शैक्षणिक गरजांच्या कमतरतेमुळे आधीच शहरात गेलेला इथला तरुण नोकरीसाठी शहरातच स्थिरावला आहे. करोनाकाळात तो गावाकडे आलाही. काहींनी आशेने शेती, दुध व्यवसायाकडे गांभीर्याने पहायला सुरुवातही केली. मात्र, गेल्या एक - दोन माहिन्यांनापासून दूध दर कमालीचे घसरले आणि अनेकांना या व्यवसायातून पर्यायाने शेतीतून काढता पाय घेत गावातून  शहरात जावे लागले.
 
पारंपरिक संगोपन पद्धत, कृत्रिम रेतनसाठी कांड्या निवडताना न बघितल्या जाणाऱ्या कांड्या, आजारी गाईं- म्हशींना औषधोपचार करताना नक्की  कोणती औषधं वापरली जात आहे याचीअपूरी माहिती, अशा एक न अनेक बारकाव्यात मराठवाडा आणि इथला दूध उत्पादक शेतकरी अडकला आहे.  जे दुध संघ  निर्माण झाले त्यांचे अस्तित्व ही त्या ठराविक क्षेत्रासाठी राहिले आणि इथल्या खाजगी दूध संकलन केंद्रांची लूट काही थांबली नाही. 

दूध अनुदान आणि मराठवाडा 

मराठवाड्यात सर्वाधिक दूध संकलन हे पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात असलेल्या मोठमोठ्या खाजगी तथा सहकारी संस्थांमार्फत केले जात. दुधाचे दिवसेंदिवस कमी होत जाणारे दर, शेतकऱ्यांचा आणि आंदोलकांचा आक्रमक पवित्रा यामुळे सहकारी दूध संघांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रतिलीटर 5 रूपयांचे अनुदान सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे सध्या राज्यातील घटलेल्या दुधाच्या दराने पिचलेल्या शेतकऱ्यांना काहीसा आधार मिळणार आहे. बऱ्याचदा दूध संकलन केल्याची पावती देखील दूध उत्पादकांना मिळत नाही. अशा वेळी शासनाने जाहीर केलेले (सहकारी संस्थेसाठी असलेले) ५ रुपये अनुदान खरंच इथल्या शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना मिळेल का याबाबत पेच आहे. 

दूध भेसळ आणि कारवाई 

बरेच दूध संकलन केंद्र चालक दुधाची चव घेऊन बघतात, दूध वेगवेगळ्या मशीनद्वारे तपासून बघतात. मुळात बहुतांशी शेतकरी जास्तीत जास्त दहा लिटर दुध एका वेळेस केंद्रावर घेऊन जाणारे आहोत, अशा वेळी भेसळ करणे आम्हांला देखील परवडणारे नाही असे शेतकऱ्यांनी सांगितले. शिवाय, "आमच्या घरी लेकरं आहेत. आम्ही का कुणाच्या जीवाशी खेळू? आमचे दूध तपासले जाते. मात्र, आमच्या जीवावर दूध संकलन केंद्र चालक मोठे होत असताना त्यांचे दूध का तपासले जात नाही? असा सवाल देखील शेतकऱ्यांनी केला. 

 

Web Title: Who will give Rs 5 subsidy to our milk? Farmers in Marathwada are in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.