दुग्ध व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी बचत गटांना, शेतकरी उत्पादक कंपन्यांना बल्क मिल्क कुलर देण्यासाठी 50 ते 75 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील दुग्ध व्यवसायाला चालना देऊन महिला सक्षमीकरणासाठी एकात्मिक दुग्धविकास कार्यक्रमांतर्गत पात्र महिलांना हे अनुदान मिळू शकते. यासाठीचा शासन निर्णय नुकताच कृषी पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विकास विभागाने जारी करण्यात आला आहे.
राज्यातील सहकार क्षेत्रमार्फत चालविल्या जाणाऱ्या दुग्ध व्यवसायाला चालना देऊन शीतसाखळी निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी मिल्को टेस्टर दूध संकलनाच्या क्षमतेनुसार 1000 ते 2000 लिटर क्षमतेचे बल्क मिल्क कुलर्स खरेदी करण्यासाठी काही मर्यादेपर्यंत निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काय आहेत पात्रता अटी?
• यासाठी लाभार्थी महिला बचत गटांना त्यांची उमेद योजनेअंतर्गत नोंदणी असणे आवश्यक आहे. • तसेच तो महिला बचत गट कृषी व दुग्धपूरक व्यवसायात किमान तीन वर्षे सलग पुरवठादार असणे गरजेचे आहे.• लाभार्थी महिला बचत गटाला द्वितीय मूल्यांकन प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.• महिला बचत गटांकडे कोणतीही थकबाकी नसल्याचे सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.• लाभार्थी महिला बचत गटांनी राज्यात व केंद्र शासनाच्या योजनांमधून यापूर्वी उपरोक्त घटकांकरिता लाभ घेतलेला नसावा.