देशाच्या अवर्षणप्रवण, अर्ध-अवर्षणप्रवण आणि डोंगराळ भागात जेथे पीक आणि दुग्धव्यवसाय आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत नाही, अशा ठिकाणी त्याचप्रमाणे अत्यल्प भूधारणा, अल्प भूधारक शेतकरी आणि भूमिहिन मजूरांना उपजिविका करण्यासाठी मेंढ्यांची मोठ्या प्रमाणात मदत होते मेंढ्यांना लोकर ही निसर्गाने दिलेली देणगी आहे.
मेंढ्यांचे लोकर हे महत्वाचे नैसर्गिक फायबर आहे. लोकरमध्ये थर्मल रेग्युलेशन, फ्लेम रेझिस्टन्स, चांगले ध्वनीशास्त्र इ. असे अद्वितीय गुणधर्म आहेत. लोकरचा वापर कपड्यांपासून बांधकाम उद्योगांपर्यंत आणि तांत्रिक कापडाच्या अनेक क्षेत्रांमध्ये केला जातो.
महाराष्ट्र राज्यात सुमारे ३० लाख संख्या असून मेंढ्यांपासून दरवर्षी अंदाजे ९८०० मेट्रिक टन लोकरीचे उत्पादन होते. तथापि, राज्यात खरखरीत लोकरीवर प्रक्रिया करण्यासाठी पायाभूत सुविधा नसल्यामुळे मेंढीपालन करणाऱ्या समुदायाला आर्थिक फायदा होऊ शकत नाही. डेक्कनी मेंढयांच्या काळ्या आणि तपकिरी लोकरपासून विविध मूल्यवर्धित उत्पादने विकसित केली जाऊ शकतात.
तसेच या लोकरापासून योगा चटई आणि रजाई यांसारखी मूल्यवर्धित वूल फेल्ड उत्पादने मिळू शकतात, अशा उत्पादनांची निर्मिती महाराष्ट्रातच मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. मूल्यवर्धनाच्या दिशेने लोकर प्रक्रिया उद्योगांची स्थापना केल्याने मेंढीपालन समुदायाचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल आणि ग्रामीण भागातील शहरांकडे होणारे स्थलांतरही कमी होईल.
महाराष्ट्रात मेंढ्यांच्या लोकरीपासून आता उच्च दर्जाचे उबदार कपडे, स्वेटर आणि गालिचे अशा नित्योपयोगी वस्तू तयार होणार आहेत. लोकरीपासून तयार होणाऱ्या अशा दर्जेदार वस्तूंसाठी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात करंदे येथे लोकरीवर प्रक्रिया करणारे केंद्र उभारण्यात येणार आहे. संशोधन केंद्रामुळे शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून मेंढीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना लोकरीपासून उत्पन्न वाढविण्यास मदत होणार आहे.
उबदार वस्त्रांकरिता लोकर प्राप्तीसाठी मेंढी हा प्रमुख स्रोत आहे. मेंढ्यांना लोकर ही निसर्गाने दिलेली देणगी आहे. मेंढ्यांचे लोकर हे महत्त्वाचे नैसर्गिक फायबर आहे. पुरातन काळापासून लोकर हा एक अतिशय उपयुक्त तंतू म्हणून गणला गेलेला आहे. लोकरीचा वापर योगा चटई आणि रजाई तसेच कपड्यांपासून बांधकाम उद्योगांपर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये केला जातो.
महाराष्ट्रात सुमारे ३० लाख मेंढ्या असून दरवर्षी अंदाजे ९८०० मेट्रिक टन लोकरीचे उत्पादन होते. विशेष म्हणजे, फक्त अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे सुमारे ३ लाख एवढ्या मेंढ्यांची संख्या आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील मौजे करंदी (ता. पारनेर) येथे लोकर प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी ३ हेक्टर जमीन देण्यात आली आहे.