Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > नको चिंता हिरव्या वैरणीची; सुका चारा आहाराद्वारे फायदेशीर दुग्धव्यवसायाचा लागला शोध

नको चिंता हिरव्या वैरणीची; सुका चारा आहाराद्वारे फायदेशीर दुग्धव्यवसायाचा लागला शोध

Don't worry about green fodder; Profitable dairy farming discovered through dry fodder feeding | नको चिंता हिरव्या वैरणीची; सुका चारा आहाराद्वारे फायदेशीर दुग्धव्यवसायाचा लागला शोध

नको चिंता हिरव्या वैरणीची; सुका चारा आहाराद्वारे फायदेशीर दुग्धव्यवसायाचा लागला शोध

सुका चारा बनवा अधिक पोष्टिक आणि सकस

सुका चारा बनवा अधिक पोष्टिक आणि सकस

शेअर :

Join us
Join usNext

सध्या सर्वत्र चारा टंचाई निर्माण झाली असून यांचे कारण म्हणजे यंदा झालेला अल्प पाऊस होय. अशात पशुपालकाकडील गुरांना हिरवा चरा उपलब्ध नसल्याने अनेकांनी आपापली जनावरे बाजरा विकली आहे. अशा परिस्थितीत सुका चारा देखील पोष्टिक आणि सकस ठरू शकतो ते कसे वाचा.

दुग्धव्यवसायाच्या क्षेत्रात सर्वात अधिक खर्च हा चारा व्यवस्थापनावर मोठ्या प्रमाणात आहे. मात्र आता यावर एक नवीन मार्ग समोर येत आहे तो म्हणजे मुख्य वैरणीत कोरड्या चाऱ्याचा वापर. पारंपारिकपणे, दुग्धव्यवसाय ताज्या हिरव्या चाऱ्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो.

ज्यासाठी जमीन, पाणी आणि श्रम या सर्वांची सांगड आवश्यकता असते. परंतु, आता अनेक शेतकरी कोरड्या चाऱ्याची क्षमता वाढवून एक नवीन मार्ग तयार करत आहेत. ज्यामुळे आर्थिक बचत होऊन प्रभावी मिळकत हमखास मिळणार आहे.

कोरडा चारा ज्यामध्ये गवत, सायलेज आणि पिकांचे अवशेष असतात, ते ताज्या हिरव्या चाऱ्यापेक्षा अनेक फायदे देतात. तसेच हे अधिक सहजपणे साठवले जातात. शिवाय, कमी सुपीक जमिनीत कोरड्या चाऱ्याची लागवड करता येते. तसेच कमी पाण्यात देखील कोरडवाहु चारा उपलब्ध होतो. या उपलब्ध चाऱ्यावर मीठ/युरिया प्रक्रिया करून आपण हा चारा पोष्टिक आणि सकस करून जनावरांना वैरणीत देता येतो. 

आता अनेक शेतकरी टोटल मिश्रित रेशन (TMR) सारख्या धोरणांचा वापर करत आहेत. ज्यात सुका चारा (मुरघास, गहू/तूर भुस्सा, कडबा कुट्टी) आदी एकत्रित करून वैरण दिली जाते. ज्यातून ही एकत्रित वैरण दुग्धजन्य जनावरांसाठी संतुलित पोषक आहार मानली जाते. तसेच यातून दूध उत्पादन देखील टिकून राहते  आणि जनावरांचे आरोग्य सुधारते. 

सुका चारा सकस कसा ??

•  सुका चारा पाणी विरहित असल्याने त्याची चयापचनाची  क्रिया अधिक प्रभावी आहे. 

•  पाणी असलेला हिरव्या चार्‍याच्या तुलनेत त्यातून निम्मा सुका चाराच जनावरांना पुरेसा असल्याने सुका चारा दिल्यास चारा कमी लागतो. 

•  सुका चारा वैरणीत दिल्यास दूधाचा फट देखील टिकून असतो.

•  तसेच सुका चारा दिल्याने आरोग्य संतुलन बिघडत नाही. 

हेही वाचा - वाळलेल्या चाऱ्यावर करा युरिया प्रक्रिया मिळेल पौष्टिक चारा

 

Web Title: Don't worry about green fodder; Profitable dairy farming discovered through dry fodder feeding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.