Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > चाऱ्याचे संकट असतानाच दुधाचे दर घटल्याने उत्पादकांचे 'दिवाळे'

चाऱ्याचे संकट असतानाच दुधाचे दर घटल्याने उत्पादकांचे 'दिवाळे'

Farmers 'bankrupt' due to falling milk prices amid fodder crisis | चाऱ्याचे संकट असतानाच दुधाचे दर घटल्याने उत्पादकांचे 'दिवाळे'

चाऱ्याचे संकट असतानाच दुधाचे दर घटल्याने उत्पादकांचे 'दिवाळे'

खासगी दूध संघाकडून कवडीमोल दराने दुधाची खरेदी सुरू असून, दूध उत्पादक शेतकऱ्यांवर मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाण्याची वेळ

खासगी दूध संघाकडून कवडीमोल दराने दुधाची खरेदी सुरू असून, दूध उत्पादक शेतकऱ्यांवर मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाण्याची वेळ

शेअर :

Join us
Join usNext

शासनाने दूधदर निश्चित करूनही अवघ्या दोन-तीन महिन्यांत दुधाचे खरेदी दर कमालीचे घटले. त्यामुळे ऐन दिवाळीत दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहे. पावसाअभावी चारा संकट ओढावले आणि सोबत दुधाचा दरही घटल्याने शेतकऱ्यांत संतापाची लाट उसळली आहे. खासगी दूध संघाकडून कवडीमोल दराने दुधाची खरेदी सुरू असून, दूध उत्पादक शेतकऱ्यांवर मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाण्याची वेळ आली आहे.

कोविड प्रकोपानंतर मागील वर्षी प्रथमच दूध व्यवसायात उभारी आली आणि दुधाचे दर ३८ ते ४० रुपये झाले. परिणामी कोविडमध्ये उद्ध्वस्त झालेला शेतकरी व तरुण या व्यवसायात मोठ्या संख्येने उतरला. लाखो रुपये किंमतीच्या संकरीत दुधाळ गायी व म्हशी खरेदी करून आपल्या संसाराची विस्कटलेली घड़ी बसवण्यासाठी प्रयत्न करू लागला. पण हा आनंद चिरकाल न राहता त्यावर विरजण पडले.

अवघ्या काही महिन्यात दूधदर ढासळत राहिले ते आजपर्यंत त्यावर शासनाने नेमलेल्या विविध समित्या फक्त कागदावरच राहिल्याने दूध उत्पादक मात्र दराअभावी देशोधडीला लागत आहेत. त्यात चालू वर्षी पावसाने जोरदार दडी मारल्याने पशुधनाचा चारा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उन्हाळ्याच्या भीषण झळा आत्ताच चटका देत आहेत. त्याचा विपरीत परिणाम दुग्ध व्यवसायावर होत असून, दूध उत्पादन घटत चालले असताना दर कमी कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यात जनावरांच्या पोषण आहार (खुराक) यांच्या किंमतीवर शासनाचे नियंत्रण नसल्याने अव्वाच्या सव्वा भावाने विक्री होत आहे. सरकी, कांडी याची भाववाढ अटळ होत असताना शासन मात्र सुस्त असल्याचे दूध व्यावसायिक दादासाहेब जगताप यांनी सांगितले.

पशुखाद्याला सोन्याचे मोल दुधाचे दर ३८ रुपये होते. मात्र मागील तीन महिन्यांपासून एकवेळ घातलेल्या दुधाला २७ रुपये तर दोन वेळा दूध संकलन करणाऱ्या शेतकऱ्याला ३० रुपये प्रतिलिटर भाव मिळत आहे. म्हणजे लिटरमागे ६ ते ९ रूपयांची घट झाली आहे. तर दुसरीकडे पशुखाद्याचे दर आजही १७०० ते १८०० रुपये असल्याने त्या दरात काहीच फरक नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

 

Web Title: Farmers 'bankrupt' due to falling milk prices amid fodder crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.