Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >मासे पालन > पवनी तालुक्यात झाली ३.५ कोटी मत्स्य जिरे निर्मिती !

पवनी तालुक्यात झाली ३.५ कोटी मत्स्य जिरे निर्मिती !

3.5 crore fish cumin was produced in Pavani taluka! | पवनी तालुक्यात झाली ३.५ कोटी मत्स्य जिरे निर्मिती !

पवनी तालुक्यात झाली ३.५ कोटी मत्स्य जिरे निर्मिती !

मत्स्य पालन सहकारी संस्थांना मत्स्य उत्पादनासाठी पाटबंधारे तलाव सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांचे मार्फत व लघु पाटबंधारे तलाव आणि मामा तलाव हे जिल्हा परिषद मार्फत दिल्या जातात.

मत्स्य पालन सहकारी संस्थांना मत्स्य उत्पादनासाठी पाटबंधारे तलाव सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांचे मार्फत व लघु पाटबंधारे तलाव आणि मामा तलाव हे जिल्हा परिषद मार्फत दिल्या जातात.

शेअर :

Join us
Join usNext

भंडारा जिल्ह्यातल्या पवनी तालुक्यातील निष्टी, धानोरी व सिरसाळा येथे संस्थेमार्फत व खासगी स्वरूपात मोगरा बांधमध्ये मत्स्य जिरे निर्मिती करण्यात आली. यातून साडेतीन कोटी मत्स्य जिरे निर्मिती झाली आहे. भंडारा तलावाचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. यात पाटबंधारे तलाव, लघुपाटबंधारे तलाव, मामा तलाव व जिल्हा परिषदेचे तलाव आहेत. मत्स्य पालन सहकारी संस्थांना मत्स्य उत्पादनासाठी पाटबंधारे तलाव सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांचे मार्फत व लघु पाटबंधारे तलाव आणि मामा तलाव हे जिल्हा परिषद मार्फत दिल्या जातात.

तलावामध्ये मत्स्य उत्पादन करिता जुलै, ऑगस्ट महिन्यात मत्स्यबीज टाकले जाते. याकरिता पश्चिम बंगाल, छत्तीसगड येथून मत्स्य बीज विकत घेऊन टाकले जात होते. परंतु जिल्ह्यातील मत्स्यबीजची आवश्यकता जिल्ह्यात पूर्ण व्हावी आणि भंडारा जिल्हा मत्स्यबीजसाठी स्वावलंबी व्हावे याकरिता भंडाऱ्याचे मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त उमाकांत सबणीस यांच्या मार्गदर्शनामध्ये जिल्ह्यात मोगरा बांध, ओलीत बांध व सुष्क बांध द्वारा मत्स्यबीज निर्मिती करण्यात आली.

मत्स्यबीज निर्मिती करिता निष्टी मच्छी उत्पा. संस्थेचे मन्साराम नागपुरे, भगवान डहारे, प्रकाश डहारे, धनराज डहारे, सुरेंद्र डहारे, नंदकिशोर डहारे, हरिदास नागपुरे, मोतीराम डहारे, अमित पचारे, संदीप डहारे, चंद्रशेखर पचारे, धानोरी मच्छी उत्पा. संस्थेचे विलास दिघोरे, नामदेव वाघधरे, शंकर दिघोरे, भगवान नान्हे, खटू दिघोरे, गोवर्धन वाघधरे, दारासिंग नान्हे, श्रावण कांबळे, दामाजी पदेले आणि वामन डहारे, चंद्रगुप्त डहारे, नितुल पचारे, उमेश पचारे, सुरेश डहारे, दिलीप मोहनकर, आकाश नागपुरे, हरी डहारे, विलास डहारे अथक प्रयत्न केले.

Web Title: 3.5 crore fish cumin was produced in Pavani taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.