Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >मासे पालन > ऐन मत्स्य हंगामामध्ये जेलिफिशचे संकट

ऐन मत्स्य हंगामामध्ये जेलिफिशचे संकट

A jellyfish crisis during the fishing season | ऐन मत्स्य हंगामामध्ये जेलिफिशचे संकट

ऐन मत्स्य हंगामामध्ये जेलिफिशचे संकट

जेलिफिशमुळे मोठी मासळी किंवा कोळंबी मासळी लांबवर पलायन करीत आहे. मंगळवारी पद्मजलदुर्गाजवळ सुमारे ४० यांत्रिक नौका कोळंबी मासेमारी गेल्या.

जेलिफिशमुळे मोठी मासळी किंवा कोळंबी मासळी लांबवर पलायन करीत आहे. मंगळवारी पद्मजलदुर्गाजवळ सुमारे ४० यांत्रिक नौका कोळंबी मासेमारी गेल्या.

शेअर :

Join us
Join usNext

पोषक वातावरण असल्याने गेल्या काही दिवसांपासून मच्छीमारांना सुगीचे दिवस येतील असे दिसत होते. मात्र, जेलिफिशचे संकट समोर उभे राहिले आहे. जेलिफिशमुळे मोठी मासळी किंवा कोळंबी मासळी लांबवर पलायन करीत आहे. मंगळवारी पद्मजलदुर्गाजवळ सुमारे ४० यांत्रिक नौका कोळंबी मासेमारी गेल्या. परंतु त्यांना समाधानकारक मासळी मिळू शकली नाही. कोळंबीऐवजी जाळ्यात कचरा, पालापाचोळाच अधिक मिळाला. तो साफ करण्यासाठी मेहनत घेऊन जाळी साफ करावी लागत असल्याची माहिती रोहन निशानदार यांनी दिली.

भरपूर खेकडे सापडले
मुरुडच्या समुद्रात सोमवारी मुया नावाचे समुद्री खेकडे जाळ्यात भरपूर मिळाल्याचे एकदरा महादेव कोळी समाजाचे अध्यक्ष आणि मुरुड तालुका मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष पांडुरंग आगरकर यांनी सांगितले.

समुद्रात जेलिफिश आल्याने मासेमारीवर मोठा परिणाम दिसत आहे. कोळंबीचा सीझन असला तरी जेलिफिश कोलंबी मासळीला फस्त करीत असते. पापलेट, सुरमई, रावस सारखी मोठी मासळीने दूरवर पलायन केले आहे. - रोहन निशानदार, नाखवा, एकदरा

Web Title: A jellyfish crisis during the fishing season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.