Join us

ऐन मत्स्य हंगामामध्ये जेलिफिशचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 10:53 AM

जेलिफिशमुळे मोठी मासळी किंवा कोळंबी मासळी लांबवर पलायन करीत आहे. मंगळवारी पद्मजलदुर्गाजवळ सुमारे ४० यांत्रिक नौका कोळंबी मासेमारी गेल्या.

पोषक वातावरण असल्याने गेल्या काही दिवसांपासून मच्छीमारांना सुगीचे दिवस येतील असे दिसत होते. मात्र, जेलिफिशचे संकट समोर उभे राहिले आहे. जेलिफिशमुळे मोठी मासळी किंवा कोळंबी मासळी लांबवर पलायन करीत आहे. मंगळवारी पद्मजलदुर्गाजवळ सुमारे ४० यांत्रिक नौका कोळंबी मासेमारी गेल्या. परंतु त्यांना समाधानकारक मासळी मिळू शकली नाही. कोळंबीऐवजी जाळ्यात कचरा, पालापाचोळाच अधिक मिळाला. तो साफ करण्यासाठी मेहनत घेऊन जाळी साफ करावी लागत असल्याची माहिती रोहन निशानदार यांनी दिली.

भरपूर खेकडे सापडलेमुरुडच्या समुद्रात सोमवारी मुया नावाचे समुद्री खेकडे जाळ्यात भरपूर मिळाल्याचे एकदरा महादेव कोळी समाजाचे अध्यक्ष आणि मुरुड तालुका मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष पांडुरंग आगरकर यांनी सांगितले.

समुद्रात जेलिफिश आल्याने मासेमारीवर मोठा परिणाम दिसत आहे. कोळंबीचा सीझन असला तरी जेलिफिश कोलंबी मासळीला फस्त करीत असते. पापलेट, सुरमई, रावस सारखी मोठी मासळीने दूरवर पलायन केले आहे. - रोहन निशानदार, नाखवा, एकदरा

टॅग्स :मच्छीमारकोकण