Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >मासे पालन > बंदीनंतर १ ऑगस्टपासून सुरू होणार खोल समुद्रातील मासेमारी

बंदीनंतर १ ऑगस्टपासून सुरू होणार खोल समुद्रातील मासेमारी

After the ban, deep sea fishing will start from August 1 | बंदीनंतर १ ऑगस्टपासून सुरू होणार खोल समुद्रातील मासेमारी

बंदीनंतर १ ऑगस्टपासून सुरू होणार खोल समुद्रातील मासेमारी

शासनाच्या आदेशानुसार १ जूनपासून खोल समुद्रातील पावसाळी मासेमारीबंदीच्या ६२ दिवसांच्या विश्रांतीनंतर १ ऑगस्टपासून पर्ससीन नेट फिशिंग आणि खोल समुद्रातील मासेमारी या दोन्ही प्रकारांतील मासेमारीला दहा दिवसांचाच अवधी उरला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

शासनाच्या आदेशानुसार १ जूनपासून खोल समुद्रातील पावसाळी मासेमारीबंदीच्या ६२ दिवसांच्या विश्रांतीनंतर १ ऑगस्टपासून पर्ससीन नेट फिशिंग आणि खोल समुद्रातील मासेमारी या दोन्ही प्रकारांतील मासेमारीला दहा दिवसांचाच अवधी उरला आहे.

यामुळे आपल्या बोटी वल्हविण्यासाठी करंजा-मोरा-कसारा, ससूनडॉक बंदरात आतापासूनच हजारो मच्छीमारांची लगबग सुरू झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच खवळलेला समुद्र शांत होतो.

नीरव शांत झालेल्या सागरात पर्ससीन नेट फिशिंगसाठी पोषक वातावरण असते. राज्यभरातील लाखो मच्छीमार खोल समुद्रातील आणि पर्ससीन फिशिंग या दोन प्रकारांतील मासेमारी मोठ्या प्रमाणात करीत असतात.

समुद्राच्या पृष्ठभागावरील ४ ते ५ कि.मी. परिघातील परिसरात ३५ ते ४० वाव खोलीपर्यंत पर्ससीन नेट फिशिंग केली जाते. गोल परिघातील सर्कलमध्ये शिशाच्या गोळ्या बांधलेली जाळी समुद्रात सोडली जाते.

गोलाकार सर्कल सील केल्यानंतर समुद्राच्या पृष्ठभागावरील विविध प्रकारांतील तरंगती मासळी अलगद जाळ्यात अडकते. त्यानंतर यंत्राच्या साहाय्याने जाळी मच्छीमार बोटीत खेचतात.

• घोळ, काटबांगडे, मुशी, तकला, सुरमय, शिंगाला, तुणा, हलवा, तांब, पाखट यांसारखी मासळी याठिकाणी पकडली जाते.
• मासेमारीसाठी मच्छीमारांना ५० ते ७० वाव खोल समुद्रात जावे लागते. 
• त्यासाठी एका ट्रिपसाठी १० ते १२ दिवस खर्ची घालावे लागतात. तिला सव्वा ते दीड लाखापर्यंत खर्च येतो.
• समुद्राच्या तळाशी असलेली सर्वच प्रकारची मासळी या पद्धतीत पकडली जाते.
• चांगल्या प्रतीची निर्यात करण्यायोगी मासळी खोल समुद्रातील मासेमारीत मिळत असल्याने या पद्धतीच्या मच्छीमारांची संख्या सर्वाधिक आहे.

मासळीची आवकही वाढणार
• दहा दिवसांत मासेमारीला सुरुवात होणार असल्याने नौकांची यांत्रिक दुरुस्ती, रंगरंगोटी, जाळी आदी तत्सम कामांसाठी हजारो मच्छीमारांची विविध बंदरात लगबग सुरू आहे.
• दि. १ ऑगस्ट पासूनंतरच मच्छीमार बोटींना डिझेलचा कोटा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे डिझेल भरण्यासाठी मच्छीमार बोटींची कसारा आणि ससूनडॉक बंदरात हळूहळू गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे.
• डिझेल, आवश्यक साधन-सामुग्री उपलब्ध होताच तत्काळ हजारो मच्छीमार बोटी १ ऑगस्टपासून मासेमारीसाठी रवाना होणार आहेत.
• मासेमारीला सुरुवात होताच १०-१५ दिवसांत मासळीची आवक वाढणार आहे. त्यामुळे वाढलेले भाव आटोक्यात येऊन खवय्यांनाही बाजारात विपूल प्रमाणात मासळी उपलब्ध होणार आहे.

Web Title: After the ban, deep sea fishing will start from August 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.