Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >मासे पालन > biofloc fish farming मत्स्यपालनात आलं नवीन तंत्रज्ञान; आता कमी जागेत, कमी कालावधीत घ्या अधिक उत्पादन

biofloc fish farming मत्स्यपालनात आलं नवीन तंत्रज्ञान; आता कमी जागेत, कमी कालावधीत घ्या अधिक उत्पादन

biofloc fish farming New technology in fisheries; Now get more product in less space, in less time | biofloc fish farming मत्स्यपालनात आलं नवीन तंत्रज्ञान; आता कमी जागेत, कमी कालावधीत घ्या अधिक उत्पादन

biofloc fish farming मत्स्यपालनात आलं नवीन तंत्रज्ञान; आता कमी जागेत, कमी कालावधीत घ्या अधिक उत्पादन

गेल्या ५०-६० वर्षांमध्ये मत्स्य संवर्धन क्षेत्रात वापरले जाणारे विविध तंत्रज्ञान व प्रणाली यांचा वेगाने विकास झालेला आहे. मत्स्य संवर्धन क्षेत्रात वापरले जाणारे तंत्रज्ञान हे मुख्यतः संवर्धन करण्यात येणाऱ्या मत्स्य प्रजातींची जलद वाढ व त्यांचा जीवित दर सुधारण्याकरिता वापरली जातात.

गेल्या ५०-६० वर्षांमध्ये मत्स्य संवर्धन क्षेत्रात वापरले जाणारे विविध तंत्रज्ञान व प्रणाली यांचा वेगाने विकास झालेला आहे. मत्स्य संवर्धन क्षेत्रात वापरले जाणारे तंत्रज्ञान हे मुख्यतः संवर्धन करण्यात येणाऱ्या मत्स्य प्रजातींची जलद वाढ व त्यांचा जीवित दर सुधारण्याकरिता वापरली जातात.

शेअर :

Join us
Join usNext

गेल्या ५०-६० वर्षांमध्ये मत्स्य संवर्धन क्षेत्रात वापरले जाणारे विविध तंत्रज्ञान व प्रणाली यांचा वेगाने विकास झालेला आहे. मत्स्य संवर्धन क्षेत्रात वापरले जाणारे तंत्रज्ञान हे मुख्यतः संवर्धन करण्यात येणाऱ्या मत्स्य प्रजातींची जलद वाढ व त्यांचा जीवित दर सुधारण्याकरिता वापरली जातात.

यात बायोफ्लॉक (जैवपुंज) तंत्रज्ञान, पुनर्वापर मत्स्यसंवर्धन प्रणाली (रास), गिफ्ट तिलापिया माशांचे संवर्धन, पंगस माशांचे संवर्धन, पिंजऱ्यातील मत्स्य संवर्धन, सुधारित बिजांचे संगोपन, पाण्याची प्रत मोजणारे आणि पाण्याची प्रत सुधारणारे संयंत्र, स्वयंचलित फिडर इत्यादी.

बायोफ्लॉक तंत्रज्ञान
बायोफ्लॉक म्हणजे जिवाणू, वनस्पती प्लवंग, आदि जीव आणि कणस्वरूपातील सेंद्रिय पदार्थ म्हणजेच खाद्य व विष्ठा यांचा संमिश्र पुंजका.

आवश्यक बाबी
• जास्त प्रमाणात आणि सतत लागणारा वीज पुरवठा
• अखंड वीज पुरवठा नसल्यास जनरेटर किंवा इन्व्हर्टरची सोय असावी तलाव निर्मिती प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज असते.
• कार्बन घटकांच्या वापरावर जास्त खर्च येतो.

बायोफ्लॉक तंत्रज्ञानाचे फायदे
• जास्त घनतेमध्ये माशांची साठवणूक करता येते माशांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते.
• मत्स्य संवर्धनादरम्यान खाद्याचे व प्रथिनांचे कमी प्रमाण लागते.
• जैवपुंज (फ्लोक) स्वरूपातील जिवंत खाद्य सतत उपलब्ध असल्याने माशांची वाढ जलद होण्यास मदत होते.

बायोफ्लॉक तंत्रज्ञानाचे तत्व
मत्स्य संवर्धनादरम्यान शिल्लक राहिलेले खाद्य, विष्ठा आणि अमोनिया यांच्या माध्यमातून नत्रयुक्त टाकाऊ पदार्थ तयार होतात. परोपजीवी जिवाणू या नत्रयुक्त टाकाऊ पदार्थांचा वापर करून स्वतःची संख्या वाढवितात.

या जिवाणूंची संख्या भरपूर वाढली तर ते एकमेकांना जोडले जातात आणि त्याचा पुंजका तयार होतो. या पुंजक्यात वनस्पती प्लवंग, आदिजीव आणि प्राणी लवंग इत्यादी संलग्न असतात, म्हणूनच याला जैवपुंज (बायोफ्लॉक) असे म्हणतात.

जिवाणूंची संख्या वाढविण्यासाठी कार्बन ते नत्र गुणोत्तर (C:N ratio) १०:१ च्या वर असणे गरजेचे असते नत्रयुक्त टाकाऊ पदार्थांचे प्रमाण कमी झाल्यावर पाण्याचा दर्जा सुधारण्यास मदत होते तसेच तयार होणारा बायोफ्लॉक चा उपयोग नैसर्गिक खाद्य म्हणून होतो

बायोफ्लॉक तंत्रज्ञान
• बायोफ्लॉक तयार करण्यासाठी ईनाकुलम (संरोप/विरजण) तयार करावा लागतो संरोप तयार करण्यासाठी तलावातील सुकी माती वापरली जाते.
• १८ ते २२ मिलिग्रॅम माती १२ मिलिग्रॅम अमोनियम सल्फेट आणि २२० मिलीग्राम आंबवलेली उसाची काकवी प्रति लिटर पाण्यात मिसळून हे मिश्रण मध्ये आवश्यक प्रमाणात बुडबुडे हवा (एरिएशन) सोडली जाते.
• ४५ तासानंतर तयार झालेली संरोप तलावामध्ये सोडले जाते
• प्रति घनमीटर जागेसाठी ४५ ते ५५ लिटर संरोप वापरावे एरिएशन हा या तंत्रज्ञानाचा अविभाज्य घटक आहे त्यामुळे पाण्याचे योग्य अभिसरण होण्यासाठी तलावाचे चारी कोपरे गोलाकार करून घ्यावेत. संवर्धित मासळीने न-खालेले पूरक खाद्य आणि उत्सर्जित झालेल्या नायट्रोजन याचा वापर करून जिवाणू आणि एक पेशी वनस्पतींचे जैव पुंज तयार केले जाते, जे संवर्धित मासळी खाद्य म्हणून वापरते, त्यामुळे माशांना पूरकखाद्य कमी प्रमाणात लागते आणि खाद्याचा अपव्यय होत नाही.
• या तंत्रज्ञानामध्ये नायट्रोजन उत्सर्जित घटकांचा वापर करून जैवपुंज तयार केल्यामुळे पाण्याची गुणवत्ता टिकून राहण्यास मदत होते आणि वारंवार पाणी बदलण्याची गरज भासत नाही.

- मत्स्य विस्तार शिक्षण विभाग
मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी

अधिक वाचा: खेकडा शेती कशी केली जाते; त्याच्या पद्धती कोणत्या?

Web Title: biofloc fish farming New technology in fisheries; Now get more product in less space, in less time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.