Join us

दक्षिण, पूर्व भारताासह मुंबई, गुजरातमध्ये मासे पकडण्याचे प्रमाण वाढले

By मुक्ता सरदेशमुख | Published: June 23, 2024 4:20 PM

देशातील मासेमारीत महाराष्ट्र पाचवा म्हणजे ५.९८ टक्के एवढा वाटा

महाराष्ट्रातील मासे पकडण्याचे प्रमाण सलग दुसऱ्या दिवशी वाढले असून २०२२ मधील १.७ लाख टनांवरून ते २४.३ टक्के वाढले आहे. महाराष्ट्राचा मासेमारीत देशात ५वा क्रमांक लागतो. केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्थेच्या अहवालानुसार, राज्यात रायगड जिल्ह्याचा मासेमारीत २१.१ टक्के एवढा वाटा आहे. यात मुंबईच्या बंदरांचा सर्वाधिक वाटा आहे. 

देशातील मासेमारीत महाराष्ट्र पाचवा म्हणजे ५.९८ टक्के एवढा वाटा असून यात १३ हजार टन म्हणजे तिपटीने वाढ झाली. मासेमारीत गुजरातची पकड चांगली असून केरळ ६.३३ लाख टन, कर्नाटक ६.०४ लाख टन आणि तमिळनाडू ५.६५ लाख टनांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

मागील वर्षी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आलेल्या मिचांग चक्रीवादळामुळे मासेमारीच्या दिवसांची संख्या कमी झाली होती. दक्षिणेकडील राज्यांमध्ये घट झाली असूनही सर्वात जास्त वाढ नैऋत्य किनारपट्टीवर १.३ दशलक्ष टन होते.

टॅग्स :मच्छीमारव्यवसाय