मत्स्य व्यवसाय हा पारंपारिक व्यवसाय असला तरीही अनेक वैशिष्ट्यांमुळे व आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे देश व जागतिक पातळीवर या व्यवसायास विषेश महत्व प्राप्त झाले आहे.
योग्य माशांची निवडमत्स्य संवर्धनासाठी सुमारे ७० मत्स्य प्रजातींचा उपयोग केला जातो. भारतीय प्रमुख कार्प व चायनिज प्रमुख कार्प जातीचे मासे प्रामुख्याने कटला, रोहू, मृगळ, चंदेरा, गवत्या, साइप्रिनस हे त्यांच्या वाढीच्या योग्य दरामुळे व ग्राहकांच्या पसंतीमुळे व्यावसायीक संवर्धनाकरिता वापरण्यात येते. हे मासे पाण्यातील विविध स्तरामधील प्लवंग खात असल्यामुळे या माशांचे एकत्रित संवर्धन करणे शक्य आहे.
मत्स्य संवर्धन पद्धतीकार्प जातीचे मत्स्य संवर्धन विविध पद्धतीचा अवलंब करून केले जाते. आधुनिक मत्स्य संवर्धन मुळात तीन स्तरीय प्रणाली आहे उदा. संगोपन, संवर्धन आणि उत्पादन प्रणाली. मत्स्य संवर्धनाच्या सर्व तीन टप्प्यांत जास्तीत जास्त मासे जगविण्यासाठी व उत्पादन वाढीचे प्रमाण निश्चित करण्यासाठी व्यवस्थापन पद्धतींचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, व्यवस्थापन प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर दुर्लक्ष झाले असता, उत्पादकता आणि नफ्यावर परिणाम होऊ शकतो.
व्यवस्थापन पद्धतीमुख्यतः तीन मूलभूत तलाव व्यवस्थापन पद्धती आहेत१) संचयन पूर्वीचे व्यवस्थापन.२) संचयन व्यवस्थापन.३) संचयन नंतरचे व्यवस्थापन.
पाण्यातील तणांचे निर्मूलनतलावातील तण हे माशांसाठी हानिकारक आहेत कारण, असे तण सूर्यप्रकाश तलावाच्या मध्यापर्यंत पोहचण्यास अडथळा निर्माण करतात. त्यामुळे तलावातील तणांचे निर्मूलन करण्यासाठी ती हाताने काढुन किंवा तलाव पुर्णपणे सुकवून करता येते.
भक्षक आणि नको असलेल्या माशांचे निर्मूलनभक्षक किंवा नको असलेल्या मासे थेट कार्प माशांच्या छोट्या पिल्लांचा वापर खाद्य म्हणून करतात. याशिवाय ते अन्न, जागा आणि ऑक्सिजन साठी कार्प प्रजातीसह स्पर्धा ही करतात. म्हणूनच, अशा माशांचे निर्मूलन, कार्प माशांची साठवण करण्याअगोदर करणे अनिवार्य आहे. तलावातील पाणी पुर्णपणे सुकवून किंवा महुआ ऑईल केक (महुआची पेंड) वापरुन भक्षक माशांचा नाश करता येतो.
तलावामध्ये चुन्याचा वापरसर्वसाधारणपणे २००-३०० किलो चुना एक हेक्टर क्षेत्रफळ आणि एक मीटर खोली असलेल्या तलावामध्ये वापरतात. चुना वापरण्याच्या २ ते ३ दिवस आधी खताचा वापर केल्याने तलावाची उत्पादकता आणि पाण्यातील कॅल्शियमचे प्रमाण वाढते.
तलावामध्ये खतांचा वापरतलावातील पाण्याची नैसर्गिक उत्पादकता सेंद्रिय व असेंद्रीय रासायनिक खतांचा वापरणे वाढते. तलावातील पाणी गुणवत्ता, तापमान, तलावाच्या पोषक घटकांनुसार खतांचा दर बदलतो. सेंद्रिय खत जसे की शेणखत यांचे प्रमाण १००० किलोग्रॅम/हेक्टर आणि असेंद्रीय खतांमध्ये यूरिया २५ किलो/हेक्टर आणि सिंगल सुपर फॉस्फेट २० किलो/हेक्टर साधारणपणे प्रत्येक महिन्यात वापरावे.
मत्स्यबिजांची संचयनमासाच्या खाद्याच्या सवयीनुसार भारतीय प्रमुख कार्प व चायनिज कार्प वेगवेगळ्या थरावर तलावामध्ये असतात. मत्स्यबिजांची साठवणीचा दर, तलावाच्या क्षेत्रावरआणि मतस्यबिजांची अवस्था यावर अवलंबून असते. मत्सबीज संचयनाच्या दरम्यान माशांना कमीत कमी ताण देणे आणि नवीन हवामानाशी किंवा परिस्थितीशी रूळण्याची क्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. या कृतीमध्ये गुंतवलेल्या वेळेमुळे मरतुक प्रमाण कमी होण्यास मदत होते.
पूरक खाद्याचा वापरशेंगदाणा पेंड आणि धान्याचा कोंडा एक समान मिश्रण करून पुरवणी खाद्य द्यावे. याचबरोबर दुसऱ्या खाद्य पदार्थांचा वापर म्हणजे चण्याचा भुसा, गव्हाचा आटा, सोयाबीनची पेंड सुद्धा माशांसाठी देऊ शकतो. दरम्यान अनुक्रमे १-२, ३-४ आणि ५-६ महिने मत्स्यबिजाच्या वजनाच्या ४-३, ३-२ आणि २-१ टक्के आहार दिला जातो. मोठ्या माशांना (५०० ग्राम वरील) वजनाच्या १.५% पूरक आहार देणे आवश्यक आहे.
मासळीचे आरोग्य व्यवस्थापनतलावामध्ये दर १५ दिवसांनी जाळे मारून माशांचे आरोग्य तपासणे आवश्यक आहे. शरीराच्या पृष्ठभागावर जर परजीवी असल्यास त्वरित तपासून बाहेर काढावेत. जर एखादा मासा रोग ग्रस्त झाला असेल किंवा मेला असेल तर त्याला तत्काल बाहेर काढले पाहिजे.
माशांची तलावातून काढणीमत्स्यबीज संचयन के ल्यानंतर ८-१० महिन्यामधे त्यांचे वजन ८०० ग्राम पर्यंत झाल्यास त्यांना बाजारात विकले पाहिजे. आजच्या काळात कार्प मत्स्यबीज सहज उपलब्ध असल्यामुळे बहुतेक शेतकरी एकाच वेळी मत्स्यबीज संचयन न करता दोन ते तीन वेळा संचयन करतात. यामुळे पहिल्या वेळी जे बीज टाकले आहे ते ६-७ महिन्यात विक्री योग्य होतात. असे केल्यास शेतकऱ्याला प्रत्येक महिन्याला माशे विकून जो नफा मिळतो व त्याचा खाद्य आणि खतांचा खर्चासाठी वापर करता येतो.
स्थानिक हवामान परिस्थिती लक्षात घेता, कमी वेळेत उत्तम व्यवस्थापन पद्धती आधुनिक कार्प मत्सयशेती प्रणाली मध्ये फायदेशीर आहे. कार्प बियाण्याची स्थानिक उपलब्धता ही खाजगी मत्स्य शेतीला मजबूत टप्पा आणि या व्यवस्थापकाला अवलंबन केल्यास शेतकरी कमीत कमी दरवर्षी ३-५ टन प्रती हेक्टर उत्पादन करू शकेल.अधिक माहितीसाठी संपर्कभाकृअनुप-राष्ट्रीय अजैविक स्ट्रैस प्रबंधन संस्थानमाळेगाव, बारामती, पुणे, महाराष्ट्र०२११२-२५४०५७