Join us

Drone Fishing : मत्स्यपालन आणि सागरी शेतीमध्ये होणार ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 11:39 AM

ड्रोन क्षेत्रातील असंख्य आव्हानांसाठी ड्रोन अनेक प्रकारे सहाय्य करते. पाण्याचे नमुने घेणे, रोग ओळखणे आणि माशांचे खाद्य व्यवस्थापन ही महत्वाची क्षेत्रे आहेत.

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्या (MoFAH&D), अंतर्गत येणाऱ्या मत्स्यपालन विभागाने, ८ नोव्हेंबर २०२४ रोजी आयसीएआर-केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्था कोची, केरळ येथे मत्स्यपालन आणि अ‍ॅक्वाकल्चर अर्थात सागरी शेती यामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रात्यक्षिक या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती. 

हा कार्यक्रम जॉर्ज कुरियन, राज्यमंत्री, मत्स्यव्यवसाय विभाग आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय यांच्यासह मान्यवर, शास्त्रज्ञ, राज्य मत्स्य व्यवसाय अधिकारी, मच्छीमार यांच्या उपस्थितीत झाला

विशेष करुन आपत्तींच्या काळात जलशेती आणि मत्स्यपालनातील पायाभूत सुविधांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाच्या भुमिकेवर त्यांनी  प्रकाश टाकला.

ड्रोन क्षेत्रातील असंख्य आव्हानांसाठी ड्रोन अनेक प्रकारे सहाय्य करते. पाण्याचे नमुने घेणे, रोग ओळखणे आणि माशांचे खाद्य व्यवस्थापन ही महत्वाची क्षेत्रे आहेत.

जलशेतीचे व्यवस्थापन,मत्स्यविपणनावर लक्ष ठेवणे, मत्स्यपालनाच्या पायाभूत सुविधांच्या नुकसानीचे मूल्यांकन आणि नैसर्गिक आपत्तींच्या वेळी बचाव कार्ये यांचाही यात समावेश आहे.

यामध्ये अचूकपणे मासे पकडणे आणि स्टॉक मुल्यांकन  यासारख्या इतर प्रमुख उपक्रमांचा समावेश आहे.

पाण्याखालील (अंडरवॉटर) ड्रोन, याव्यतिरिक्त, माशांच्या नैसर्गिक अधिवासातील वर्तनावर तसेच संकटाच्या लक्षणांवर लक्ष ठेवू शकतात.

ड्रोन तंत्रज्ञानाच्या ऍप्लिकेशन आणि प्रात्यक्षिकावरील कार्यशाळेने नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानातील प्रगती दाखवण्यासाठी एक अनोखे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

ज्यामुळे मत्स्यपालन क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाची क्षमता वाढवण्यासाठी त्याच्या परिवर्तनीय भूमिकेवर भर दिला. या कार्यक्रमात ७०० मच्छीमार व्यावसायिक सहभागी झाले होते.

टॅग्स :मच्छीमारतंत्रज्ञानकेंद्र सरकारसरकारकेरळपाणी