रत्नागिरी जिल्ह्यात आंबा, शेती या दोन व्यवसायाबरोबरच मासेमारी हाही एक प्रमुख व्यवसाय आहे. जिल्ह्याला लाभलेल्या विशाल समुद्र किनाऱ्यामुळे मासेमारी व्यवसाय वृद्धिंगत होत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत सातत्याने हवामानात होणाऱ्या बदलाचा परिणाम मासेमारीवर होत आहे. चांगले उत्पन्न मिळवून देणारा हा व्यवसाय आता हवामानाच्या तडाख्यात सापडला आहे.
वारंवार होणारी वादळे, अवकाळी पाऊस यामुळे मासेमारी व्यवसायच बंद होण्याची भीती व्यक्त होत आहे. मागील १० वर्षांची आकडेवारी पाहता मत्स्य उत्पादन निम्म्यावर आले आहे. मात्र, गतवर्षीच्या मोसमापेक्षा यंदाच्या मौसमात बऱ्यापैकी मासेमारी झाली असून, त्यातच पर्ससीन मासेमारीला चांगले दिवस असले तरी फार वर्षांपासून ट्रॉलिंग पद्धतीने सुरु असलेल्या मासेमारीचे भवितव्य अंधकारमय आहे.
ट्रॉलिंग मासेमारी करणाऱ्या नौकांच्या संख्येत दरवर्षी घट होत चालल्याने मच्छीमारांची चिंता अधिक वाढत चालली आहे. ट्रॉलिंग मासेमारी करणाऱ्या नौकांचा व्यवसाय डबघाईला आला आहे. त्यातच मासे मिळण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा कमी झाल्याने, या नौका मालकांचा डिझेलचा खर्च निघत नसेल तर खलाशांचा खर्चही भागवता येत नाही. त्यामुळे खलाशांचे पलायन नौका मालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
वेळोवेळी समुद्रात होणारे वातावरणातील बदल, समुद्रातील प्रदूषण आणि मार्शाचे प्रमाण पूर्वर्वीपेक्षा कमी, यामुळे मासेमारी व्यवसायाला धोका निर्माण झाला आहे. भविष्यात हा व्यवसाय टिकेल की नाही, असाही प्रश्न मच्छीमारांसमोर उभा राहिला आहे. जिल्ह्यात पर्ससीन नेट मासेमारी व्यवसायाला चांगले दिवस आलेले असले तरी ट्रॉलिंग मासेमारी हळूहळू कमी होत
चालली आहे.
ट्रॉलिंग मासेमारीला तारण्यासाठी शासनाने त्यासाठी ठोक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी बेकायदेशीर एलईडी द्वारे चालणारी मासेमारी तसेच ठराविक अंतर सोडून बेकायदेशीरपणे घुसखोरी करून मासेमारी करण्यावर प्रतिबंध लावण्यात आलेला असला तरी त्यांच्यावर कडक कारवाई करणे आवश्यक आहे.
परराज्यातील नौकांची घुसखोरी, एलईडी द्वारे होणारी बेकायदेशीर मासेमारी यामुळे आधीच संकटात आलेली मासेमारी आता बदलत्या हवामानाच्या कचाट्यात सापडली आहे. त्यामुळे मासेमारीचे उत्पन्न घटून मासेमारी व्यवसायाची नौका बुडण्याची भीती निर्माण झाली आहे.
नौका मालक कर्जबाजारी
आज बहुतांश नौका मालक कर्जबाजारी आहेत. प्रत्येक नौका मालकावर लाखो रुपये कर्ज आहे. बँका, विविध वित्तीय संस्था तसेच व्याजी व्यवसाय करणाद्यांकडून कर्जाची उचल केलेली आहे. त्यातच व्यापाऱ्यांकडून कर्ज घेतले आहे. माशांचे प्रमाण कमी झाल्याने कर्जाचे हप्ते कसे भरणार, असा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे शेतकन्यांपेक्षाही भयानक परिस्थिती आज मध्छीमारांची इगली आहे.
खलाशांची कमतरता
नौका मालकासाठी खलाशांची डोकेदुखी अधिक आहे. स्थानिक खलाशांची कमतरता असल्याने गुजरातमधील उमरगा, ओडिसा, कर्नाटक, गोवा, डहाणू आणि नेपाळी खलाशांचा भरणा करण्यात येतो. त्यांना मानधन, भोजन, आठवड्याला ठराविक रकमेचा हप्ता देण्यात येतो. हाल्याची रक्कम न मिळाल्यास तसेच वादळाच्या भीतीने खलासी पलायन करतात. त्यामुळे अनेकदा हा व्यवसाय बंद ठेवावा लागतो.
वातावरणाचा फटका
गेल्या दहा वर्षात भासे मिळण्याचे प्रमाण कमी झालेले असतानाच वातावरणातील बदलाचा परिणामही मासेमारीवर झालेला आहे. प्रत्येक आठवड्याला अचानक निर्माण होणाऱ्या वादळमय स्थितीमुळे मासेमारी बंद तेयाची लागते. नौका किनाच्द्यावर बंदरात नांगरावर ठेवाव्या लागत असल्याने मच्छीमारांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे अनेकदा डिझेलचा खर्च, खलाशांचे मानधन, कर्जाचे हप्ते भागवता येत नाहीत. त्यामुळे अनेक मच्छीमार नौका बंद झालेल्या आहेत.
सबसिडीचे घोंगडे भिजत
मासेमारी नौकांना डिझेलवर सबसिडी देण्यात येते. डिझेलच्या खरेदीनुसार नौका मालकांना शासनाकडून सबसिडी देण्यात येते. सबसिडीसाठी जिल्ह्याला कोट्यवधी रुपये शासनाकडून मिळतात. मात्र ही स्क्कम वेळेत न मिळाल्याने त्यासाठी नौका मालकांना प्रतीक्षा करावी लागते, त्यासाठी डिझेलवरील सबसिडीची रक्कम वेळेत मिळावी, अशी मागणी फार पूर्वीपासूनची मच्छीमारांची आहे. त्यामध्ये शासनाने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे.
मासेमारी जाळीतून उदरनिर्वाह
सर्वच स्थानिक मच्छीमार समुद्रात मासेमारीसाठी जात नाहीत. हातामध्ये कला असलेले काही मच्छीमार जाळी विणण्याचे कामही करतात, पर्ससीन मासेमारी बंद झाली, तरी पर्ससीन नेटवर आजही शेकडो लोकांचे पोट भरले जात आहे. मासेमारी करताना पर्ससीन नेट ही जाळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यासाठी या जाळीची दुरुस्ती करण्यासाठी स्थानिक मच्छीमारांनाच काम दिले जाते. सुमारे ५०० रुपये एका दिवसाची रोजंदारी जाळी दुरुस्तीचे काम करणाऱ्यांना दिली जाते. हे काम केवल मासेमारी हंगामातच नव्हे, तर पावसाळ्यातही सुरु असते.
अन्य व्यवसायांना हातभार
मासेमारी व्यवसायावर अनेकांचे पोट भरले जाते. केवळ मासे विक्री करून त्यावर उदरनिर्वाह करणारे आहेत, शिवाय या व्यवसायाशी निगडित इतरही व्यवसाय आहेत. त्यावर जेटीवरील पानटपरीचा व्यवसाय, टेम्पोतून माशाची ने-आण करणे, रिक्षा व्यवसाय, बर्फ कारखान्यात काम करणारे कामगार, मच्छीमार्केटच्या ठिकाणी मासे कापणाऱ्या महिलांनाही रोजगार मिळतो. त्याचबरोबर, इतरही थंड पेये विक्री, तसेच हॉटेलचा व्यवसायही मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहेत.
८,२४९ चौ. कि.मी. जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र
१६७ कि. मी. किनारपट्टी (वेसवी- मंडणगड ते विजयदुर्ग)
६,६०० कि.मी. मासेमारी क्षेत्र
२,०७४ यांत्रिकी नौका
४४६ बिगर यांत्रिकी नौका
२५२० एकूण मासेमारी नौका
४६ मासेमारी केंद्र
८५ मच्छीमार सहकारी संस्था
अधिक वाचा: चालू हंगामातील मासेमारीला उरले अवघे बारा दिवस; १ जूनपासून मासेमारीवर बंदी