Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >मासे पालन > चंद्रपूर जिल्ह्यात मत्स्यव्यवसायाला चालना देणार तर आदिवासी बांधवांना दुग्धव्यवसायासाठी म्हशी देणार

चंद्रपूर जिल्ह्यात मत्स्यव्यवसायाला चालना देणार तर आदिवासी बांधवांना दुग्धव्यवसायासाठी म्हशी देणार

Fisheries will be promoted in Chandrapur district and buffaloes will be given to tribal brothers for dairying | चंद्रपूर जिल्ह्यात मत्स्यव्यवसायाला चालना देणार तर आदिवासी बांधवांना दुग्धव्यवसायासाठी म्हशी देणार

चंद्रपूर जिल्ह्यात मत्स्यव्यवसायाला चालना देणार तर आदिवासी बांधवांना दुग्धव्यवसायासाठी म्हशी देणार

मत्स्यव्यवसायासाठी मच्छिमारांचे चांगले प्रशिक्षण, उत्तम पायाभूत सुविधा, चांगला पतपुरवठा, उत्तम मार्केटिंग सहाय्य यांची जोड मिळाल्यास मत्स्यपालन व मत्स्यव्यवसाय हा एक उत्तम उद्योग म्हणून जिल्ह्यात विकसित होऊ शकतो.

मत्स्यव्यवसायासाठी मच्छिमारांचे चांगले प्रशिक्षण, उत्तम पायाभूत सुविधा, चांगला पतपुरवठा, उत्तम मार्केटिंग सहाय्य यांची जोड मिळाल्यास मत्स्यपालन व मत्स्यव्यवसाय हा एक उत्तम उद्योग म्हणून जिल्ह्यात विकसित होऊ शकतो.

शेअर :

Join us
Join usNext

मत्स्यव्यवसाय हा रोजगार व संपन्नता देणारा उत्तम व्यवसाय आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तलावांची संख्या मोठी आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसायात चंद्रपूर जिल्हा आदर्श जिल्हा म्हणून विकसित करण्याकरता योग्य ती पावले उचलण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज आयोजित बैठकीत प्रशासनाला दिले. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, उपसचिव कि.म. जकाते, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एम.पी.काळे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मत्स्यव्यवसायासाठी मच्छिमारांचे चांगले प्रशिक्षण, उत्तम पायाभूत सुविधा, चांगला पतपुरवठा, उत्तम मार्केटिंग सहाय्य यांची जोड मिळाल्यास मत्स्यपालन व मत्स्यव्यवसाय हा एक उत्तम उद्योग म्हणून जिल्ह्यात विकसित होऊ शकतो. यासंदर्भातील सादरीकरण आजच्या बैठकीत मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्यासमोर करण्यात आले. या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेऊन जिल्हा मत्स्यव्यवसाय विकास आराखडा वेगाने तयार करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.

आदिवासी बांधवांना दुग्धव्यवसायासाठी म्हशी देणार

आदिवासी बांधवांना दुग्धव्यवसाय करता यावा म्हणून जिल्ह्यातील आदिवासी बहुल क्षेत्रात म्हशी व गायी वाटप योजनेची अंमलबजावणी करणार असल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. दुग्ध व्यवसायाबाबत तज्ज्ञांकडून आदिवासी बांधवांना प्रशिक्षण देण्याबाबतचे नियोजन प्रशासनाने करावे. त्याचबरोबर जिल्ह्यातील चारा उपलब्धता, दुधाळ जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरता पशू चिकित्सा यंत्रणा अधिक सक्षम करणे, पशू चिकित्सा यंत्रणेतील पदे भरणे, शेण आणि गोमूत्रापासून सहउत्पादने घेणाऱ्या संस्था व कंपन्यांसोबत बोलणी करून आदिवासींना उत्पन्नाचे अधिकचे स्त्रोत उपलब्ध करुन देणे, पतपुरवठ्याकरता बँकासोबत बैठका घेणे, याबाबत वेळेवर कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिल्या.
 

Web Title: Fisheries will be promoted in Chandrapur district and buffaloes will be given to tribal brothers for dairying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.