Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >मासे पालन > Fishery in Konkan: कोकणातील मासेमारी अडकली संकटांच्या जाळ्यात

Fishery in Konkan: कोकणातील मासेमारी अडकली संकटांच्या जाळ्यात

Fishery in Konkan: Konkan fishing business in lot of crisis last three four years | Fishery in Konkan: कोकणातील मासेमारी अडकली संकटांच्या जाळ्यात

Fishery in Konkan: कोकणातील मासेमारी अडकली संकटांच्या जाळ्यात

गेल्या काही वर्षांपासून या व्यवसायाला अवकळा आली आहे. त्यामुळे मच्छिमारांनी अनेकवेळा मच्छी-दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती.

गेल्या काही वर्षांपासून या व्यवसायाला अवकळा आली आहे. त्यामुळे मच्छिमारांनी अनेकवेळा मच्छी-दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती.

शेअर :

Join us
Join usNext

मासेमारी व्यवसायावर रत्नागिरी जिल्ह्याची आर्थिक नाडी अवलंबून आहे. या व्यवसायावर अनेक छोटे-मोठे व्यवसायही अवलंबून आहेत. किनारपट्टीवरील प्रमुख व्यवसाय म्हणून गणल्या गेलेल्या मासेमारी व्यवसायाची स्थिती मागील दोन वर्षांपासून फार बिकट बनली आहे.

गेल्या काही वर्षांपासून या व्यवसायाला अवकळा आली आहे. त्यामुळे मच्छिमारांनी अनेकवेळा मच्छी-दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. ही मागणी शासनाने गांभीर्याने घेणे आवश्यक होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने मच्छिमारांची आर्थिक स्थिती हालाखीची बनली आहे.

८,२४९ चौ. किमी जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र १६७ किमी किनारपट्टी (वेसवी-मंडणगड ते विजयदुर्ग) गतवर्षीही मासेमारी हंगामाच्या सुरुवातीला वादळी हवामानामुळे १ ऑगस्ट रोजी खोल समुद्रातील मासेमारी सुरू झालेली नव्हती.

गतवर्षी सततच्या वादळी वातावरणामुळे अनेकदा मासेमारी कमी झाल्याने त्याचा परिणाम या व्यवसायावर झाला होता. मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाल्याने बहुतांश नौका किनारी नांगरावर असल्याने खलाशांचा खर्च भागवणेही अवघड झाले होते.

खलाशांना वेळेवर वेतन तसेच दर आठवड्याला देण्यात येणारी ठराविक रक्कम देता येत नसल्याने नौका मालक आर्थिक विवंचनेत सापडले होते. यंदाच्या हंगामात अशीच स्थिती राहिल्यास मासेमारी व्यवसाय बंद करण्याची वेळ १४,८१६ मच्छीमार कुटुंबे (सन २००३च्या जनगणनेनुसार)  मच्छिमारांवर येणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून ट्रॉलिंग मासेमारीलाही उतरती कळा लागल्याने त्याचा परिणाम म्हणून मच्छिमारांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सततच्या हवामानातील बदलामुळे जिल्ह्यातील एकूण मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे.

रत्नागिरीचा मासेमारी आवाका
८,२४९ चौ. किमी जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र
१६७ किमी किनारपट्टी (वेसवी-मंडणगड ते विजयदुर्ग)
१४,८१६ मच्छीमार कुटुंबे (सन २००३च्या जनगणनेनुसार)
७,००० पर्ससीन नौकांवरील खलाशांची सुमारे संख्या
६,६०० किमी मासेमारी क्षेत्र
१०४ मासेमारी गावांची संख्या
२८७ पर्ससीननेट नौकांची संख्या
८५ मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था
३१ बर्फ कारखाने
४६ मासळी उतरण्याची केंद्रे
१५ शीतगृहे
११ फिशमिल प्लांट
४४२ बिगरयांत्रिकी नौका
३,०७७ यांत्रिक नौका

एलईडीविरोधात मोहीम
खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या नौकांवर मासेमारीसाठी लागणारी अत्याधुनिक यंत्रणा वापरण्यात येते. त्यामध्ये एलईडीने मासेमारी मोठ्या प्रमाणात सुरू होती. त्याचा फटका इतर मच्छिमारांना बसला होता. त्यामुळे एलईडीने मासेमारी करण्याला पारंपरिक मच्छिमारांकडून जोरदार विरोध करण्यात आला होता, त्यानंतर मत्स्य खात्याने एलईडीने मासेमारी करणाऱ्या नौकांविरोधात जोरदार मोहीम सुरू केली होती त्यांच्यावर नौका जप्ती तसेच दंडात्मक कारवाई करण्यात येत होती.

खलाशांविना नौका बंदरात
गेल्या काही वर्षापासून ट्रॉलिंग मासेमारी धोक्यात आली असल्याने नौका मालक मेटाकुटीला आले आहेत. त्यांच्याकडे खलाशांना अॅडव्हान्स देण्यासाठीही पैसे नसल्याने त्यांची मोठी कोंडी झाली आहे. त्यामुळे काही नौका समुद्रात मासेमारीसाठी जाऊ शकत नाहीत.

ट्रॉलिंग व्यावसायिकांना भविष्याची चिंता
सध्या मासेमारी सुरू झाली असली, तरी ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करणाऱ्या नौका किनारी नांगरावरच ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे ट्रॉलिंग व्यावसायिकांना भविष्याची चिंता सतावत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास वा नौका मालकांवरील कर्जाचे बोजे वाढणार असून त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

खलाशांची प्रतीक्षा
अनेक नौकामालक खलाशांच्या प्रतीक्षेत आहेत. स्थानिक खलाशांची कमतरता असल्याने गुजरातमधील उमरगा, ओडिशा, कर्नाटक, गोवा, डहाणू आणि नेपाळी खलाशांना नौकेवर ठेवले जाते. पगार, भोजन, आठवड्याला ठराविक रकमेचा हप्ता देण्यात येतो. हप्त्याची रक्कम न मिळाल्यास तसेच वादळाच्या भीतीने खलाशी पलायन करतात, त्याचा मोठा परिणाम या व्यवसायावर होतो.

वातावरणातील बदलाचा परिणाम
• गतवर्षी मासे मिळण्याचे प्रमाण कमी झालेले असतानाच वातावरणातील बदलाचा परिणामही मासेमारीवर झाला होता. प्रत्येक आठवड्याला अचानक निर्माण होणाऱ्या वादळमय स्थितीमुळे मासेमारी बंद ठेवावी लागत असे.
• नौका बंदरात नांगरावर ठेवाव्या लागत असल्याने मच्छिमारांचे आर्थिक नुकसान झाले होते. त्यामुळे डिझेलचा खर्च, खलाशांचे वेतन, कर्जाचे हप्ते भागवता येत नव्हते. त्यामुळे अनेक नौकामालकांचे आर्थिक दिवाळे निघाले होते.

- रहिम दलाल, रत्नागिरी

Web Title: Fishery in Konkan: Konkan fishing business in lot of crisis last three four years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.