भारताच्या पूर्व किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन लवकर होत असल्याने वा किनारपट्टीवर मासेमारी बंदी कालावधी १५ एप्रिल ते १४ जून २०२४ (दोन्ही दिवस धरून) तसेच पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन उशिरा होत असल्याने पश्चिम किनारपट्टीवर मासेमारी बंदी कालावधी १ जून ते ३१ जुलै २०२४ या कालावधीत विशेष आर्थिक क्षेत्रात पावसाळी मासेमारी बंदी घालण्यात आली आहे.
मासळीच्या साठ्याचे जतन तसेच मच्छीमारांची जीवित व वित्त यांचे रक्षण करण्याच्या हेतूने महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ च्या कलम ४ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, रचना केलेल्या सल्लागार समितीशी विचार विनिमय केला.
त्यानुसार शासन आदेश १ जून २०१७ अन्वये १ जून ते ३१ जुलै (दोन्ही दिवस धरुन) राज्याच्या जलधी क्षेत्रात पावसाळी मासेमारी बंदी कालावधीचे नियमन करण्यात आलेले असून सदरच्या आदेशान्वये परवानाधारक बिगर-यंत्रचालित नौकास मासेमारीची मुभा दिलेली आहे.
या कालावधीत मासळीच्या जिवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीज निर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जतन होते. तसेच या कालावधीत खराब, वादळी हवामानामुळे होणारी मच्छीमारांची जीवित व वित्तहानी मासेमारी बंदीमुळे टाळता येणे शक्य होते.
सबब, मासळीच्या साठ्याचे जतन तसेच मच्छीमारांचे जीवित व वित्त यांचे रक्षण या हेतूने यावर्षी १ जून ते ३१ जुलै २०२४ या कालावधीत राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलापर्यंत) यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांस पावसाळी मासेमारी बंदी लागू, करण्यात येत आहे.
पावसाळी मासेमारी बंदी यंत्रचलित व यांविक मासेमारी नौकांना लागू राहील. पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर-यंत्रचालित नौकांना लागू राहणार नाही.
समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सर्व यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौका १ जून २०२४ पूर्वी मासेमारी बंदरात परतणे बंधनकारक आहे. तसेच ३१ जुलै २०२४ वा त्यापूर्वी समुद्रात मासेमारीकरिता जाता येणार नाही याची नोंद घ्यावी.
राज्याच्या सागरी जलधी क्षेत्राबाहेर (सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलापुढे) खोल समुद्रात मासेमारीस आणान्या नौकांस केंद्र शासनाच्या खोल समुद्रातील मासेमारीबाबतचे धोरण, मार्गदर्शक सूचना/आदेश लागू राहणार आहेत.
राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनान्यापासून १२ सागरी मैलापर्यंत) यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौका पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी केल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा), २०२१ च्या कलम १४ अन्वये नौका व नौकेवर बसविलेली उपसाधने व मासेमारी सामग्री आणि त्यामध्ये सापडलेली मासळी जप्त करण्यात येईल तसेच कलम १७ मधील तरतुदी अन्वये जास्तीत जास्त कठोर शिक्षा लादण्यात येईल.
शासनाकडून नुकसान भरपाई मिळणार नाही■ पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकेस अपघात झाल्यास अशा नौफेस शासनाकडून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नाही.■ पावसाळी कालावधीमध्ये राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात मासेमारी नौकास आवागमन निषिद्ध आहे.■ राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्याापासून १२ सागरी मैलापर्यंत) पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकेने बेकायदेशीर मासेमारी न करणेबाबत आपले अधिनस्त सर्व मच्छीमार सहकारी संस्थास अवगत करावे.■ बंदी कालावधीत आपल्या कार्यक्षेत्रात यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकेने बेकायदेशीर मासेमारी केली जाणार नाही किवा पावसाळी मासेमारीचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
मनोज वारंगओरोस
अधिक वाचा: Fishery बदलत्या हवामानामुळे मासेमारी व्यवसाय खातोय 'हेलकावे'