हवामानातील बदल स्विकारून मत्स्यपालनासाठी कार्बन फूटप्रिंटमध्ये लक्षणीय घट करण्याचा प्रस्ताव भारताने अलिकडेच झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या एका बैठकीत दिला. मत्स्यपालनाच्या दृष्टीने हे एक महत्वाचे पाऊल असल्याचे बोलले जात आहे.
देशाच्या सागरी मत्स्यव्यवसायात पकडले जाणारे प्रति किलो मासे कार्बन उत्सर्जनामुळे जागतिक सरासरीपेक्षा १७.७ टक्क्यांनी कमी झाल्याचे भारताने सांगितले. ICAR सेंटर मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट ने जारी केलेल्या प्रकाशनुसार भारताने मत्स्यपालनाच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल उचलत कार्बन फूटप्रिंटमध्ये घट करण्याचा प्रस्ताव दिला. १५ ते १८ जानेवारी दरम्यान ही आभासी बैठक आयोजित करण्यात आली होती.
हवामानातील लवचिक मत्स्यपालन करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल समजले जात आहे. यासाठी समुद्री शेवाळाच्या कार्बन क्षमतेचा उपयोग करून घेण्यासह खारफूटी परिसस्था वाढवण्यासह कार्बन उत्चाननाचा मार्ग सुकर करण्याच्या शिफारसी भारताने संयुक्त राष्ट्रांसमोर केल्या आहेत.